• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सावधानतेचे पाऊल कोरोनामुक्तीकडे; जिल्ह्यातील 747 गावे कोरोना मुक्त

Team by Team
June 28, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
93 1
0
health worker corona warrier
14
SHARES
669
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कोरोना महामारीच्या प्रकोपाने भेडसावलेला अकोला जिल्हा आता अत्यंत सावधानतेने कोरोनामुक्तीकडे पाऊल टाकत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असतांना जिल्ह्यातील 844 पैकी 747 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ‘गाव करी ते राव न करी’, या म्हणीप्रमाणे गावकऱ्यांनी एकजुटीने कोरोना विरुद्ध आपपाल्या गावात मुकाबला केला आहे. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे आजचे ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचा मोकळा श्वास घेतला जातोय.

याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात 535 ग्रामपंचायतीतील 844 गावांपैकी 747 गावे कोरोना विषाणूने बाधीत होते. तर 51 गावामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावच दिसून आला नाही.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कोरोनाची दुसरी लाट कमी होत असून सद्यास्थितीत 747 गावे कोरोना मुक्त झाली आहेत. या गावांमध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसून सर्व रुग्ण बरे होऊन गाव कोरोना मुक्त झाले आहे. सद्यस्थितीत 46 गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून या गावांमध्ये 112 कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात 31 प्राथमिक आरोग्य केंद्र, 178 उपप्राथमिक आरोग्य केंद्र, पाच ग्रामीण रुग्णालय व मुर्तिजापूर येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार केला जातो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन आवश्यक आहे. सोबतच प्रशासनामार्फत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 47 लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे साठवण व वितरण स्थानिक स्तरावर केले जातात. आजपर्यंत (दि.28जून) जिल्ह्यामध्ये तीन लक्ष 88 हजार 360 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी तीन लक्ष 05 हजार 276 व्यक्तींना (21 टक्के) लसीकरणाचा पहिला डोस दिला गेला. तर 83 हजार 84 व्यक्तींना (0.6 टक्के) लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. 45 वर्षावरील नागरिकांना द्यावयाचा लसीकरणाचा पहिला डोस दोन लक्ष 20 हजार 906 व्यक्तींना (30 टक्के) देण्यात आला तर 62 हजार 398 व्यक्तींना (10.3 टक्के) दुसरा डोस देण्यात आला. तसेच 18 ते 44 वयोगटातील 59 हजार 543 नागरिकांना (सात टक्के) लसीकरणाचा पहिला डोस तर सहा हजार 537 व्यक्तींना (0.7 टक्के) दुसरा डोस देण्यात आले आहे अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मनिष शर्मा यांनी दिली.

तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली असतांना गावकऱ्यांनी एकजूट दाखवून केलेली प्रत्येक गावाची कोरोनामुक्ती ही शहरी लोकांसाठीही अनुकरणीय ठरावी.

Tags: corona cases in akolaअकोला जिल्हा
Previous Post

मोठी बातमी! ३ हजार प्राध्यापक पदांची भरती

Next Post

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची योजना – कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबास पाच लाख रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची योजना – कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबास पाच लाख रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची योजना - कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबास पाच लाख रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

कोविड विषाणूच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टस बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.