अकोला– आज दि.25 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 773 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 761 अहवाल निगेटीव्ह तर 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57529(43037+14315+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 12+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी आठ = एकूण पॉझिटीव्ह-20
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 290622 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 287147 फेरतपासणीचे 396 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3079 नमुने होते. आजपर्यंत एकूण 290554 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 247517 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
12 पॉझिटिव्ह
आज दि.25 दिवसभरात 12 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट-एक, तेल्हारा-चार, बार्शीटाकळी-एक मुर्तिजापूर-एक अकोला मनपा क्षेत्र-पाच, दरम्यान काल (दि.24) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
दोघांचा मृत्यू
आज दि.25 दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात वाडेगाव ता.बाळापूर येथील 55 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 21 रोजी दाखल केले होते, तर दहिहांडा ता.अकोट येथील 46 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23 रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
28 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दि.25 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, हॉटेल इंद्रप्रस्थ येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील 11, बायस्कार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, असे एकूण 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
413 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या57529(43037+14315+177) आहे. त्यात 1126 मृत झाले आहेत. तर 55990 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 413 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.