• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोविड १९ च्या स्थितीबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सुविधांच्या सज्जतेचे नियोजन

Team by Team
June 22, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
कोविड १९ च्या स्थितीबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सुविधांच्या सज्जतेचे नियोजन
17
SHARES
629
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.२२ – जिल्ह्यात कोविड १९ संसर्गाची स्थिती आटोक्यात असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचे अनुमान वर्तविण्यात आले आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कोविड उपचार सुविधा तसेच अन्य अनुषंगिक  सेवांसाठी आरोग्य सुविधांच्या सज्जतेचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज यंत्रणांना दिले.

जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात करण्यात आले होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले,  डॉ. श्यामसुंदर शिरसाम, डॉ. आंभोरे, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे या कालावधीत लसीकरणाच्या मोहिमेला वेग यावा यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. त्यासाठी प्रत्येक नगरपालिकास्तरावर  चार नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावी. प्रत्येक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणास वेग यावा व लोकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी प्रोत्साहन योजना घोषित करावी, त्यासाठी आरोग्य यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांनी सुयोग्य प्रस्ताव तयार करावा. कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यात उभारण्यात आलेले ऑक्सिजन संयंत्रे या संयंत्रांची देखभाल सुव्यवस्थित ठेवावी, जेणेकरुन आपत्तीच्या प्रसंगी त्यांचा वापर करता आला पाहिजे. शिवाय त्यातून आवश्यकतेनुसार सिलिंडर मध्ये ऑक्सिजन भरुन  आवश्यकता असेल तेथे पाठवताही आला पाहिजे, यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधाही निर्माण करुन घ्याव्या.  याशिवाय सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करावयाच्या सुविधांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुमानानुसार जिल्ह्यात कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटल्सचे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय खाटांची संख्या वाढवून त्याठिकाणी ऑक्सिजन उपलब्धतेसह अन्य सर्व अनुषंगिक सुविधांची उपलब्धता करण्यात यावी ,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी दिले.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

तेल्हारा तालुका क्रीडासंकुला स्व.बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव द्या – प्रा.सचिन थाटे

Next Post

14 जिल्हा परीषद व 28 पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
निवडणूक

14 जिल्हा परीषद व 28 पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर

corona covid 19

Akola Corona Cases: 13 पॉझिटीव्ह, 165 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.