तेल्हारा(प्रतिनिधी)- आज दुपार पाथर्डी वासीयांची मन हेलावून टाकणारी ठरली रोजंदारीने विद्युत काम करणाऱ्या युवकाचा विद्युत खांबावर काम करतांना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि पाथर्डी येथील होतकरू असा नितीन दत्तात्रय इसमोरे वय 31 वर्ष याने तांत्रिक शिक्षणाची आवड असल्याने ITI करून तेल्हारा सबडीव्हीजन अकोट येथे शिकाऊ उमेदवार म्हणून गेल्या 3 वर्षांपूर्वी पूर्ण करून नोकरीसाठी बरेच पर्यंत केले मात्र नोकरी न लागत असल्याने महावितरण मध्ये आऊटसोर्सिंग मध्ये गेल्या वर्षा मध्ये महावितरण मध्ये काम केले, त्यानंतर महावितरण मधून त्याला कोणत्या तरी कारणावरून कमी करण्यात आले होते त्यानंतर पालकमंत्री सह महावितरण च्या वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे आऊट सोर्सिंग च्या कामात रुजू करण्यात यावे यासाठी अनेक निवेदन दिले मात्र याचा काही एक उपयोग झाला नाही, मात्र रोजगार म्हणून स्थानिक लाइनमन यांच्या हाताखाली रोजंदारीने उदरनिर्वाह व्हावा यासाठी काम करीत होता. मात्र आज दुपारी ११ केव्ही लाईन वर काम करीत असताना अचानक शॉक लागून जागीच त्याचा मृत्यू झाला. नेमके नितीन याला सदर लाईनवर काम करण्यासाठी कोणी सांगितले होते हा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर हि वार्ता वाऱ्यासारखी गावभर पसरल्याने बघ्यांची एकच गर्दी जमली होती. यावेळी तेल्हारा पोलिसांनी घटनास्थल गाठून पंचनामा करून मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ग्रामीन रुग्णालय तेल्हारा येथे पाठवण्यात आले आहे. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.
आऊटसोर्सिंग मध्ये काम करणाऱ्यांवर गछन्ती
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपूर्वी तेल्हारा व अकोट येथील आऊटसोर्सिंग महावितरण मध्ये काम करणाऱ्या अधिकारांच्या हेखोखेर पणामुळे जवळपास पाच जणांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते त्यामध्ये मृतक नितीन इसमोरे याचा सुद्धा समावेश होता त्यामुळे सदर युवकावर रोजंदारीने काम करण्याची वेळ आली होती हे विशेष.
महावितरण च्या हलगर्जीपणा मुळे सदर युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाचा कुटुंबियांनी केला
नितीन दत्रातय इसमोरे हा आयटीआय झालेला असून त्याने शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असल्याने तो नेहमी पाथर्डी गावातील नागरीकांच्या व शेतकऱ्यांच्या विजेचा सतत होत असलेला खंडित होत असलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आज 20 जून रोजी दुपार दरम्यान शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी नितीन याने वीज रोहित्र बंद करून वीज पुरवठा बंद केला व विजेच्या पोल वर चढला मात्र त्याला तिथे शॉक लागला. असा आरोप करण्यात आला आहे नितीन घरातील कर्ता युवक गेल्याने महावितरण कडून मृतकाचा कुटुंबियाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.