तेल्हारा (प्रतिनिधी) -वाडी अदमपुर ते तेल्हारा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्याचा जोर वाढण्याआधीच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या मार्गावरून नागरिकांना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. वाडी अदमपुर ते तेल्हारा 6 की. मी. रस्ता असून वाडी अदमपुर या गावापासून दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तीन चार वर्षा अधिक केले होते तेव्हापासून रस्त्याचे साधी डागडुजी करण्यात आली नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे . रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावरून वाडी अदमपुर, इसापूर, जाफ्रापुर उकळी बाजार, उकळी बु. वरुड वडनेर, वागंरगाव, बाभुळगाव, तळेगाव पा. वरुड वडनेर आदी गावचे नागरिक तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात त्यामुळे मार्गावर मोठ्याप्रमाणात प्रमाणात वाहतूक आहे. वाडी अदमपूर गावापासून दोन की. मि..रस्त्याची वाट लागली असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचत असल्याने शेतकरी ,व्यापारी ,नागरिकांचा प्रवास खरडतर झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यातून मार्गक्रमण करताना केव्हाही लहान-मोठे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे तेल्हारा ते वाडी अदमपुर, उकळी बाजार रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु या मार्गावरील वाडी अदमपुर गावचे मधोमध दोन किलोमीटर रस्त्याचे काम शिल्लक आहे. सदर मार्ग एक वर्ष आधी जिल्हा परिषद बांधकाम विभाग विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. वाडी आदमपूर गावापासून रस्ता खड्डेमय झालेला आहे.सतत मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तरी लोक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी याबाबत दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यास उपोषण
रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे पावसाळ्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यास उपोषण करू.
रुपेश वल्लभदाजी राठी
सरपंच गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर
परिसरातील नागरीकांना ञास
या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन दोन वर्षापुर्वी झालेले असुन नेमके वाडी अदमपुर पासुन दोन किलो मिटर रस्त्याचे काम का करण्यात आले नाही याची चौकशी करुन या रस्त्याचे काम लवकर सुरु करावे जेणे करुन या परिसरातील नागरीकांना ञास होणार नाही
मिराताई बोदडे
सरपंच ग्रा पं ईसापुर
रस्त्यावर मोठमोठे खड्डे
गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे यामुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते संबंधित विभागाचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते.
गोपाल भाकरे
वाडी अदमपुर नागरिक