• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सोमवारपासून (दि.२१) निर्बंधात आणखी शिथिलता: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झाला निर्णय

Team by Team
June 19, 2021
in अकोला
Reading Time: 2 mins read
167 2
0
akola
28
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- जिल्ह्याचा कोविड पॉझिटीव्हीटी दर ४.९७ टक्के व ऑक्सिजन बेडवरील रुग्ण संख्या दर १३.७१ टक्के दर्शविण्‍यात आला आहे. त्याअनुषंगाने सोमवार दि.२१ पासून पुढील आदेशापर्यंत सुरु करावयाच्या विविध सेवांबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले. त्यानुसार निर्बंधात आणखी शिथिलता देण्यात आली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्या बैठकीत आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

यावेळी झालेल्या निर्णयानुसार, जिल्ह्याचा कोविड पॉझीटीव्‍ही रेट व उपलब्‍ध ऑक्‍सीजन बेडची स्थिती लक्षात घेता Level-2 नुसार निर्बंधासह अकोला शहर तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता सोमवार दि.२१ च्या सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत विविध सेवांबाबत निश्चित करण्यात आलेल्या वेळा याप्रमाणे-

अ.क्र. तपशिल निश्चित करण्‍यात आलेली वेळ
१ अत्‍यावश्‍यक वस्‍तुंशी  संबंधीत दुकाने/ प्रतिष्‍ठाने / आस्‍थापना. सायंकाळी  सात वाजेपर्यंत

( दुध व औषधीची दुकाने निय‍मित वेळेनुसार )

२ बिगर अत्‍यावश्‍यक वस्‍तुंशी संबंधीत दुकाने/ प्रतिष्‍ठाने / आस्‍थापना सायंकाळी  सात वाजेपर्यंत
३ चित्रपटगृहे , नाट्यगृहे, मनोरंजन केंद्र ५० टक्के आसन क्षमतेसह रात्री १०  वाजेपर्यंत
४ रेस्‍टॉरेंट / भोजनालय ५० टक्के आसन क्षमतेसह. रात्री दहा  वाजेपर्यंत
५ सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगींग पार्क/सायकलिंग नियमित
६ खाजगी कार्यालये नियमित वेळेनूसार
७ सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालय उपस्थिती १०० टक्के उपस्थितीसह
८ सर्व क्रीडा विषयक उपक्रम नियमित.
९ सामाजिक, सांस्‍कृतिक कार्यक्रम/ स्‍नेह संम्‍मेलन, मनोरंजनात्‍मक कार्यक्रम ५० टक्के आसन क्षमतेसह.

सायंकाळी  सात वाजेपर्यंत

१० लग्‍न समारंभाचे आयोजन मंगल कार्यालय/ सभागृहामध्‍ये

( आस्न क्षमतेच्‍या ५० टक्के  किंवा  १०० व्‍यक्‍ती या पैकी जे कमी असेल. )

११ अंत्‍यविधी ५० व्‍यक्‍ती मर्यादेत
१२ स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था /सहकारी संस्‍था यांच्‍या सर्व साधारण सभा आयोजन/ निवडणूक सभागृहाच्‍या ५० टक्के क्षमतेसह.
१३ बांधकाम नियमित
१४ कृषी विषयक सेवा व सेवा केन्‍द्र नियमित वेळेनूसार
१५ ई-कॉमर्स  वस्‍तु व सेवा नियमित वेळेनूसार
१६ जीम/व्‍यायामशाळा/सलुन/ब्‍युटी पार्लर/स्‍पा/वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेसह सायंकाळी  सात वाजेपर्यंत
१७ सार्वजनिक वाहतूक नियमित  (उभ्‍याने प्रवास करता येणार नाही)
१८ सर्व प्रकारची कार्गो वाहतूक नियमित
१९ आंतरजिल्‍हा प्रवासी वाहतूक

( खाजगी, कार, टॅक्‍सी, बस, रेल्‍वे ई. द्वारे )

आंतरजिल्‍हा प्रवासी वाहतूकीस मुभा असेल, तथापि Level – ५  मधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडे ई-पास असणे अनिवार्य राहील.
२० औद्यो‍गिक केन्‍द्र / एमआयडीसी नियमित
२१ उत्‍पादन क्षेत्र ( अत्‍यावश्‍यक  वस्‍तु व त्‍याकरिता लागणारा कच्‍चा माल, उत्‍पादक व पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा व निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग, सरंक्षण संबधीत उद्योग, डाटा सेंटर / क्‍लाऊड सर्व्हिस प्रोव्‍हायडर / माहिती व तंत्रज्ञान सेवा  संबंधी / गुंतागुतीचे पायाभुत सेवा व उद्योग ) नियमित
२२ उत्‍पादन क्षेत्र ( अत्‍यावश्‍यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग वगळून इतर सर्व प्रकारचे  उद्योग जे अत्‍यावश्‍यक सेवा अंतर्गत समाविष्‍ट नाही व निर्यात प्रधान नाहीत.) नियमित

१. संपूर्ण अकोला शहर व जिल्‍हातील शहरी व ग्रामीण भागामध्‍ये फौजदारी प्रक्रिया संहिता- १९७३ चे कलम १४४ अन्वये अंतर्गत जमावबंदी लागू राहील.

२. उपरोक्‍त नमूद विवरणपत्रानुसार जी आस्‍थापना / दुकाने / प्रतिष्‍ठाने ई ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना अंतर्गत स्‍वच्‍छता व सार्वजनिक शिस्‍तीचे पालन करावे.

३. कोविड नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या व्‍यक्‍तींवर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍याबाबतचे आदेश यापूढेही कायम राहतील. या बाबतची तपासणी तसेच अंमलबजावणी ही संबंधीत अनुज्ञप्‍ती प्राधिकारी, महसूल विभाग, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन विभाग यांची राहील.

हे आदेश सोमवार दि. २१ च्या सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

Akola Corona Cases: 19 पॉझिटीव्ह,92 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Next Post

दोन बायका फजिती ऐका! विवाहित तरुणाला GF सोबतही करावं लागलं लग्न; आता दोघींना द्यावे लागणार 3-3 दिवस

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
marriage

दोन बायका फजिती ऐका! विवाहित तरुणाला GF सोबतही करावं लागलं लग्न; आता दोघींना द्यावे लागणार 3-3 दिवस

milkha singh

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.