अकोला – अकोला पाटबंधारे विभागां तर्गत असलेल्या पाटबंधारे प्रकल्पावरुन २०२१-२२ मध्ये जलाशयात उपलब्ध साठ्यानुसार खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या जलसाठ्यातून ज्या लाभधारकांना पाणी हवे असेल त्यांनी आपले पाणी अर्ज हे दि.१५ जुलै पर्यंत पाठवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित शाखा कार्यालय वा उपविभाग कार्यालयाशी संपर्क करावा. पाणी मागणीचे कोरे नमुना अर्ज हे शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहेत. पाणी मागणी करणारा शेतमालक असावा, कुळ अगर वहितदार असल्यास मागणी सोबत मालकाचे संमतिपत्र द्यावे. सर्वे नंबर व पोट हिस्स्यांची अचूक नोंद करावी, इ. सुचनाही कळविण्यात आल्या आहेत.