• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 26, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अर्थकारण

SBI अलर्ट! काही काळ बंद राहणार ‘ही’ सेवा; लवकर आटपून घ्या पैशांचे व्यवहार

Team by Team
June 16, 2021
in अर्थकारण
Reading Time: 1 min read
132 1
0
SBI चे ग्राहक आहात? बातमी वाचलीच पाहिजे!
20
SHARES
949
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक इंडियाकडून (SBI) ग्राहकांना महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. एसबीआयने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. 17 जून म्हणजेच गुरुवारी बँकेची खास सर्व्हिस ही बंद असणार आहे. एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगसह डिजिटल सेवा दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बँकेकडून सिस्टीम अपग्रेडेशन सुरू आहे. त्यामुळेच ग्राहकांना दोन तास एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगचा वापर करता येणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. महत्त्वाचे पैशाचे व्यवहार असतील तर ते लवकर आटपून घ्या असं सांगण्यात आलं आहे. आपल्या ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी वेळोवेळी मेंटेनेन्स आणि अपग्रेडेशनचं काम सुरू आहे. गुरुवारी देखील अशाच पद्धतीने अपग्रेडेशन सुरू राहील. 17 जून रोजी दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत इंटरनेट बँकिंगची सुविधा बंद राहील. सिस्टीम अपग्रेडशनच्या काळात इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप (YONO App), योनो लाइट (YONO Lite) आणि यूपीआय (UPI) लाईट या सर्व सुविधा बंद असणार असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

येत्या काळात पैशांचे व्यवहार करताना समस्या येऊ नये म्हणून बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना 30 जूनपूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं, अशा सूचना दिल्या आहेत. सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागाने पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवली आहे. बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं. पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे असं म्हणत बँकेने ग्राहकांनी सूचना दिली आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बंद होऊ शकतं. तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे 30 जूनपूर्वी पॅन आधार लिंक करुन घ्या, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

एसबीआयने ट्विटरवर आपल्या लाखो ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार SBI ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही आमच्या ग्राहकांना फसवणूक करणार्‍यांपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहोत. तुमचा कोणताही संवेदनशील डेटा ऑनलाईन शेअर करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करुन अ‍ॅप डाउनलोड करू नका, अशी सूचना केली आहे.” एसबीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही ग्राहकाने त्याची वैयक्तिक माहिती जसं की जन्मतारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी यासारखी माहिती कोणसोबत शेअर करू नका.

Tags: SBI BankingSBI Online Banking
Previous Post

कोरोना लस : दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केलीच नव्हती, भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा!

Next Post

Sexual health Tips : सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात….

RelatedPosts

RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Nirmala Sitharaman
Featured

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

December 17, 2024
RBI
Featured

RBI चा बँकांना मोठा दिलासा, ‘CRR’ मध्ये कपात, सर्वसामान्यांना काय फायदा ?

December 6, 2024
rbi
Featured

रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम, RBI चा निर्णय

December 6, 2024
Nirmala Sitaraman
Featured

बँक खात्यात ४ नॉमिनी जोडता येणार, अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती

December 5, 2024
सोन्याचे बिस्किट
Featured

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले…!

May 31, 2024
Next Post
during periods

Sexual health Tips : सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात....

murder crime

धक्कादायक! विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.