• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोना लस : दोन डोसमधील अंतर वाढविण्याची शिफारस केलीच नव्हती, भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक दावा!

Team by Team
June 16, 2021
in Corona Featured, आरोग्य
Reading Time: 1 min read
147 2
0
vaccination
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :  देशात कोरोना महारोगराईची दुसरी लाट पूर्णतः ओसरलेली नाही. अशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने लसीकरण अभियान राबवले जात आहे. परंतु, त्यातच काही राज्‍यात लसीचा तुटवडा निर्माण झाला असून अनेकांना लसीच्या प्रतिक्षेत थांबावे लागत आहे. दरम्यान, ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनी देण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत. याआधी कोव्हिशिल्ड लसीच्या पाहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर ४ ते ६ आठवडे होते. त्यानंतर पुन्हा गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित केले. त्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) मधील काही वैज्ञानिकांनी, दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती, असा धक्कादायक दावा केला आहे. तसेच या निर्णयाला, आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा या गटातल्या ३ सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात एका प्रसिद्ध वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

केंद्राने कोरोनाच्‍या रुग्‍णसंख्‍येवर नियंत्रण आणण्यासाठी कोरोना प्रतिबंध लसीकरणावर भर देण्यात येत आहे. सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. मात्र, देशात लसींचा तुटवडा आहे. त्यातच केंद्र सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या गटाने दिलेल्या सल्ल्यावरून सांगण्यात आले होते. मात्र याच गटातील यापैकी काही तज्ज्ञांनी या निर्णयाला आपण कधीही समर्थन दिले नाही, असा खुलासा केला आहे.

हेही वाचा

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

दरम्यान, NTAGI च्या वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील हाच सल्ला देण्यात आला होता. तथापि १२ ते १६ आठवडे हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तर केंद्र सरकारच्या सध्याच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याच्या निर्णयानुसार संभाव्य कोणते परिणाम होऊ शकतात, याचा कोणताही तपशील NTAGI कडे नाही, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते रॉयटर्सशी बोलताना म्हणाले. त्यांच्या दाव्याला NTAGI मधील दुसरे सदस्य मॅथ्यु वर्गेसी यांनी दुजोरा दिला आहे.

त्याचबरोबर याच गटातील दुसरे एक सदस्य जे. पी. मुलीयिल यांनी देखील गुप्ते यांच्या त्या दाव्याला दुजोरा देत, तज्ज्ञांच्या गटामध्ये दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत चर्चा झाली होती. पण आमच्या गटाणे दोन डोसमधील अंतर हे १२ ते १६ आठवडे करा असे आम्ही म्हटलोच नाही. तसेच कोणतीही आकडेवारी सांगितली गेली नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर देशातील अनेक घटकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. लसींच्या तुटवड्यामुळेच केंद्र सरकारने असा निर्णय घेतल्याचा आरोप राजकीय पटलावर झाला. मात्र, हा निर्णय लसींच्या तुटवड्यामुळे नसून तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या शिफारशींनुसार घेण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या पद्धतीवर टीका करत वायरोलॉजिस्ट शाहीद जमील यांनी देखील यावर तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच त्यावेळी त्यांनी, दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयामागची कारणे संबंधित यंत्रणांनी स्पष्ट करावीत, अशी मागणीही त्यांनी केली होती. तसेच त्यांनी, ज्या काळात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्या काळात आपण मोठ्या प्रमाणावर लोकांना लस द्यायला हवी असेही म्हटले होते.

Tags: covid vaccine
Previous Post

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी वाशिम येथे अन्न-औषध चाचणी प्रयोगशाळा वेगात पूर्ण करण्याचे ना. डॉ. शिंगणे यांचे निर्देश

Next Post

SBI अलर्ट! काही काळ बंद राहणार ‘ही’ सेवा; लवकर आटपून घ्या पैशांचे व्यवहार

RelatedPosts

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Featured

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

January 6, 2025
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Featured

कोरोनानंतर जगापुढे नवे संकट…! ‘ब्लिडिंग आय’ विषाणूचा 17 देशांत फैलाव, 15 जणांचा बळी

December 3, 2024
ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?
Featured

ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

November 7, 2024
औषधांवर बंदी
Featured

पॅरासिटामॉलसह 53 औषधे दर्जा तपासणीत फेल

September 26, 2024
Ambulance
Featured

तेल्हारा तालुक्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

July 4, 2024
Next Post
SBI चे ग्राहक आहात? बातमी वाचलीच पाहिजे!

SBI अलर्ट! काही काळ बंद राहणार 'ही' सेवा; लवकर आटपून घ्या पैशांचे व्यवहार

during periods

Sexual health Tips : सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.