पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे. तेल कंपन्यांनी आज (सोमवार, 14 जून 2021) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. देशात गेल्या 4 मेपासून सातत्याने इंधनाचे दर वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर हा 100 च्या पार पोहोचला आहे.
इंधनाच्या वाढत्या दराचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसाठी कच्च्या तेलाचे दर जबाबदार आहे, असा दावा सरकारकडून केला जात आहे.
इंधन दरवाढीची कारणं काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जगात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचा दर वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे, देशांतर्गत तेल कंपन्या आधारभूत किंमत निश्चित करतात. यानंतर त्यावर परिवहन शुल्क, कर, डिलर कमिशन आकारला जातो. यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शहरांनुसार बदलतात.
पेट्रोल-डिझेलचा आजचा दर काय?
रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत स्थिर राहिल्यानंतर आज मात्र त्यात वाढ झाली आहे. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.41 रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रतिलीटर 87.28 रुपये आहे. त्याशिवाय मुंबईत पेट्रोलची किंमत 102.58 रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलीटर 94.70 रुपये इतकी आहे.
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर
क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 102.27 ₹ 92.91
2 अकोला ₹ 102.13 ₹ 92.80
3 अमरावती ₹ 102.72 ₹ 93.37
4 औरंगाबाद ₹ 103.54 ₹ 95.63
5 भंडारा ₹ 102.95 ₹ 93.60
6 बीड ₹ 102.73 ₹ 93.36
7 बुलडाणा ₹ 102.90 ₹ 93.55
8 चंद्रपूर ₹ 102.45 ₹ 93.12
9 धुळे ₹ 102.64 ₹ 93.28
10 गडचिरोली ₹ 103.40 ₹ 94.03
11 गोंदिया 103.67 ₹ 94.28
12 मुंबई उपनगर ₹ 102.46 ₹ 94.54
13 हिंगोली ₹ 103.65 ₹ 94.27
14 जळगाव ₹ 103.25 ₹ 93.85
15 जालना ₹ 103.55 ₹ 94.15
16 कोल्हापूर ₹ 102.52 ₹ 93.18
17 लातूर ₹ 103.19 ₹ 93.81
18 मुंबई शहर ₹ 102.30 94.39
19 नागपूर ₹ 102.50 ₹ 93.16
20 नांदेड ₹ 104.44 ₹ 95.02
21 नंदूरबार ₹ 103.35 ₹ 93.96
22 नाशिक ₹ 102.74 ₹ 93.37
23 उस्मानाबाद ₹ 102.80 ₹ 93.44
24 पालघर ₹ 102.49 ₹ 93.09
25 परभणी ₹ 104.44 ₹ 95
26 पुणे ₹ 101.96 ₹ 92.61
27 रायगड ₹ 102.72 ₹ 93.31
28 रत्नागिरी ₹ 103.66 ₹ 94.27
29 सांगली ₹ 102.42 ₹ 93.08
30 सातारा ₹ 102.70 ₹ 93.32
31 सिंधुदुर्ग ₹ 103.75 ₹ 94.36
32 सोलापूर ₹ 102.26 ₹ 92.92
33 ठाणे ₹ 101.77 ₹ 92.40
34 वर्धा ₹ 102.26 ₹ 92.93
35 वाशिम ₹ 102.81 ₹ 93.46
36 यवतमाळ ₹ 102.51 ₹ 93.18