अकोला– आज दि.10 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 769 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 718 अहवाल निगेटीव्ह तर 51 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 278 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 30 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56958(42715+14066+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 51 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 30= एकूण पॉझिटीव्ह- 81.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 280691 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 277241 फेरतपासणीचे 395 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3055 नमुने होते. आजपर्यंत एकूण 280584 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 237869 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
51 पॉझिटिव्ह
आज दि.10 दिवसभरात 51 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 17 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-15, बार्शीटाकळी-एक, पातूर-दोन, बाळापूर-चार, तेल्हारा-दोन, अकोट-पाच, अकोला-22. (अकोला ग्रामीण-पाच, अकोला मनपा क्षेत्र-17), दरम्यान काल (दि.9) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 30 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
278 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दि.10 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 14, आयुवेदिक महाविद्यालय येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील सहा, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील एक, हॉटेल इंदप्रस्त येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील सहा, फातीमा हॉस्पीटल येथील चार, तर होम आयसोलेशन मधील 230 असे एकूण 278 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
एकाचा मृत्यू
आज दि.10 दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली. 55 वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णास दि. 9 जून रोजी मृतावस्थेत दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
1929 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56958(42715+14066+177) आहे. त्यात 1106 मृत झाले आहेत. तर 53923 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1929 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.