• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

निर्माणाधिन रस्त्यांच्या कामांचा आढावा :कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या प्रदूषण स्थितीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश

Team by Team
June 3, 2021
in अकोला, वाहतूक
Reading Time: 1 min read
81 0
0
bacchu kadu meeting
13
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यात रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. त्यात अकोला शहर ते जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. ही कामे पावसाळ्याच्या आत पूर्ण  करणे आवश्यक आहे. तथापि, किमान पावसाळ्यात वाहतुकीसाठी हे रस्ते सुरक्षित असायला हवेत याची दक्षता घ्या.  तसेच रस्त्याची कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या प्रदूषण स्थितीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अहवाल प्राप्त करुन सादर करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली निर्माणाधिन रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता , कार्यकारी अभियंता,  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,  जागतिक बॅंक प्रकल्प इ. विविध संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी पावसाळ्याच्या पार्श्वभुमिवर रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याबाबत  आढावा घेण्यात आला.  रहदारीला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही या पद्धतीने व्यवस्था करावी. पावसाळ्यात नागरिकांचे हाल होऊ देऊ नका. अपूर्ण कामे कधीपर्यंत पूर्ण होतील याबाबत कालमर्यादेसह अहवाल सादर करा आणि त्या कालमर्यादेचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा.  रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने त्याचा वातावरणावरील प्रदूषणाचा परिणाम तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून येत्या १५ दिवसांत अहवाल मागवा, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

Tags: akola newsAkola news in Marathibacchu kadu
Previous Post

कंत्राटी कामगारांना सर्व लाभ दिले जात असल्याबाबत विभागप्रमुखांनी खात्री करावी- बच्चू कडू

Next Post

कोविड-१९आढावा: प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पालक व बालकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कंत्राटी कामगारांना सर्व लाभ दिले जात असल्याबाबत विभागप्रमुखांनी खात्री करावी-  बच्चू कडू

कोविड-१९आढावा: प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पालक व बालकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.