• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अर्थकारण

केवळ 5 हजार रुपये गुंतवून मिळवा 50000, या व्यवसायासाठी मोदी सरकारही करत आहे मदत

आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही छोटी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. भारतात एक मोठा वर्ग आहे जो चहाप्रेमी आहे. त्यात 'कुल्हड' अर्थात मातीच्या कप्समधून चहा पिण्याची मजा काही औरच असते. या कुल्हडकडे तुम्ही एक व्यवसाय म्हणून पाहू शकता.

Team by Team
June 3, 2021
in अर्थकारण
Reading Time: 1 min read
88 0
0
INDIAN CURRENCY

INDIAN CURRENCY

17
SHARES
632
VIEWS
FBWhatsappTelegram

जर तुम्ही नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त कमाईचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमचा स्वत:चा असा छोटेखानी व्यवसाय (business opportunity) सुरू करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशी बिझनेस आयडिया (Small Business Idea) सांगणार आहोत, ज्यातून दर महिन्याला तुमची चांगली कमाई होईल. भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. त्यात ‘कुल्हड’ अर्थात मातीच्या कप्समधून चहा पिण्याची मजा काही औरच असते. सध्या या कुल्हडची मागणी वाढू लागली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये, बस डेपोत आणि विमानतळांवर देखील कुल्हडमधून चहा मिळतो. अशावेळी तुम्ही कुल्हड बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या तुम्ही कशाप्रकारे हा व्यवसाय सुरू करू शकाल.

सरकार देत आहे प्रोत्साहन

हेही वाचा

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

सरकार सध्या कुल्हडची मागणी वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. गेल्या वर्षी केंद्रीय रस्ता आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुल्हडना प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टिक आणि कागदी कपात चहा देण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती.

कुल्हड व्यवसायाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार देशभरातील कुंभारांना वीजेवर चालणारे चाक देत आहे, ज्यावर कुल्हडसह मातीची इतर भांडीही बनवता येतात. त्यानंतर सरकार या कुंभारांकडून चांगल्या किंमतीत कुल्हड खरेदी करते.

5 हजार रुपये गुंतवून सुरू करा हा व्यवसाय

सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत कमी रक्कम गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येईल. याकरता तुम्हाला थोड्या जागेसह 5000 रुपयांची आवश्यकता आहे. 2020 मध्ये सरकारने 25 हजार विद्युत चाकं वाटल्याची माहिती खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी दिली आहे.

किती रुपयांत विकता येतील कुल्हड?

चहा-कॉफी पिण्यासाठी वापरण्यात येणारं कुल्हड स्वस्त असण्याबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने देखील सुरक्षित आहे. सध्याच्या दरानुसार कुल्हडचा दर 50 रुपये शेकडा आहे. याप्रकारे लस्सी आणि दुधाच्या कुल्हडची किंमत 150 रुपये शेकडा आहे. मागणी वाढल्यामुळे यापेक्षा उत्तम दराने विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

होईल चांगली बचत

शहरांमध्ये कुल्हडच्या चहाची किंमत 15-20 रुपये आहे. जर हा व्यवसाय योग्य पद्धतीने चालवला आणि कुल्हड विकण्यावर लक्ष केंद्रीत केलं तर दिवसाला 1000 रुपयांपर्यंत बचतही होईल.

Tags: business opportunitySmall business ideas
Previous Post

8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च

Next Post

बायकोला माहेरी नेल्याचा घेतला विचित्र बदला; जावयाने सासूला टार्गेट करत केलं धक्कादायक कृत्य

RelatedPosts

RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Nirmala Sitharaman
Featured

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

December 17, 2024
RBI
Featured

RBI चा बँकांना मोठा दिलासा, ‘CRR’ मध्ये कपात, सर्वसामान्यांना काय फायदा ?

December 6, 2024
rbi
Featured

रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम, RBI चा निर्णय

December 6, 2024
Nirmala Sitaraman
Featured

बँक खात्यात ४ नॉमिनी जोडता येणार, अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती

December 5, 2024
सोन्याचे बिस्किट
Featured

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले…!

May 31, 2024
Next Post
crime news

बायकोला माहेरी नेल्याचा घेतला विचित्र बदला; जावयाने सासूला टार्गेट करत केलं धक्कादायक कृत्य

robber thief

पोलिसानंच केली ज्वेलर मालकाची फसवणूक, तब्बल 1.25 कोटींचा गंडा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.