जगभरातील शेतकर्यांसाठी इंडियन फ र्टीलायझर को ऑपरेटिव्ह लिमिटिेड (इफ्फको) च्या वतीने आरजीबी सदस्यांच्या उपस्थितीत भारतात ऑनलाई-ऑफ लाईन पद्धतीने संपन्न झाललेया 50 व्या वार्षिक सर्वसाधरण बैठकीत जगातील पहिले नॅनो युरिया लिक्विड सादर केले. मातीमधील युरियाचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनातून प्रेरणा घेऊन हे संशोधन पूर्ण करण्यात आले आहे.
गुजरातच्या कलोल येथील इफ्फकोेच्या नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (एनबीआरसी) येथे इफफ कोचे शास्त्रज्ञ आणि अभियंते वर्षानुवर्षे संशोधन करत आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘आत्मनिर्भर कृषी’च्या धर्तीवर त्यांनी मालकी तंत्रज्ञानाद्वारे नॅनो युरिया लिक्विड या स्वदेशी उत्पादनाची निर्मिती केली आहे.
रोप पोषणाच्या दृष्टीने नॅनो युरिया लिक्विड अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे सुधारित पोषक गुणवत्तेसोबत उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेवरही सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास इफ्फकोच्या शास्त्रज्ञांना आहे.