अकोला : बोगस व बेकायदेशीर बियाण्यामुळेशेतीचे व पर्यावरणाचे नुकसान होते. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार अशा बियाण्याचा वापरव साठवणूक हा गुन्हा आहे व त्यासाठी 5 वर्षे कारावास व 1 लाख रूपये दंडाची तरतूद आहे.त्यामुळे शासनमान्यता नसलेल्या बीजी- 3 (एचटीबीटी) बियाण्याची लागवड करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.बीजी-2 वाणाला शासनमान्यता आहे; बीजी-3 ला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बीजी-2 वाणाचीच लागवड करावी. कुठेही बोगस व बेकायदेशीर बियाणेविक्री किंवा लागवड करताना आढळून आल्यास कृषी विभागाला माहिती द्यावी. आपले नाव गोपनीयठेवण्यात येईल व संबंधितांवर बियाणे नियंत्रण आदेश, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम,पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
बियाणेखरेदी करताना घ्या ही काळजी
बियाणे,खते खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे.देयकात पीक, वाण प्लॉट क्र., वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषीकेंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायतसमितीच्या कृषी अधिका-याकडे संपर्क साधावा. कापूस बियाणे पाकिटावरील सरकारमान्य चिन्हतपासावे. बोलगार्ड-2मध्ये उपलब्ध असलेल्या बीजी- 2 वाणाची कमाल किंमत 730 रूपये आहे. बियाणे पाकिट सीलबंद,मोहोरबंद असावे. बियाणे पाकिट, वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थो़डेबियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाण्याच्या उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरीलअंतिम मुदत तपासावी. बीजी- 2 तंत्रज्ञान सर्व वाणामध्ये सारखेच असते. त्यामुळे एकाविशिष्ट वाणाची मागणी टाळावी. कमी वजनाच्या निविष्ठा, तसेच छापील किंमतीपेक्षा जास्तकिंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी कर्मचा-यांशी संपर्क साधा.
तक्रारपेरणीनंतर दहा दिवसांत करावी
शेतक-याने कमी अंकुरणाबाबतची तक्रार पेरणी केल्यापासून10 दिवसांत कृषी विभागाकडे दाखल करावी. बियाणे उत्पादकाने केलेल्या दाव्याविरुद्ध कीडपडण्याच्या व रोग होण्याच्या शक्यतेसंबंधीची तक्रार अशी घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळदाखल करावी. जनुकेय अशुद्धतेच्या बाबतीतील तक्रार पीक 50 टक्के फुलोरा अवस्थेत आल्याच्यातारखेपासून 15 दिवसांच्या आत किंवा योग्य टप्प्यावर दाखल करावी. अनुकुलन क्षमतेच्याबाबतीतील तक्रार पीकाच्या योग्य टप्प्यावर दाखल करावी.
बोगस बियाणे कसे ओळखाल?
मान्यता नसलेले बोगस (एचटीबीटी)बियाणे आरआर, राऊंडअप बीटी, तणावरची बीटी, विड गार्ड आदी नावाने विक्री होण्याची शक्यताअसते. –
– अशा बियाण्याचीजादा दराने विक्री होऊन पावती दिली जात नाही.-
– पाकिटावरकोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण, तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेखनसतो.-
– पाकिटावरमालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.–