अकोला – हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार (दि. 1 जून) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.