तेल्हारा(प्रतिनिधी): अखिल भारतीय काँग्रेस निमंत्रक, गुजरात राज्याचे प्रभारी, राज्यसभा खासदार स्व.राजीवजी सातव यांचे 16 मे रोजी दुःखद निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची अनेक चाहत्यांची इच्छा असून सुद्धा कोरोणा महामारी मुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही. अशा त्यांच्या सर्व चाहत्यांना आत्मिक समाधान मिळावे म्हणूनआज रोजी तेल्हारा शहरातील संत सावता नगर येथे स्वर्गीय राजीवजी सातव यांच्या अस्थिकलश रथाचे आगमन झाले. यावेळी उपस्थित मान्यवराच्या हस्ते स्व.राजीवजी सातव यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पन, दिप प्रज्वलन व अस्थीकलश दर्शन घेण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे, महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ. संजीवनीताई बिहाडे, माजी तालुका अध्यक्ष शामशील भोपळे, प्रशांत देशमुख, माजी नगराध्यक्ष दयालसींह बलोदे, माळी महासंघाचे राज्य सदस्य अॅड.श्रीकांत तायडे या मान्यवरांनी स्व. राजीवजी सातव यांच्या कार्यावर प्रकाश टाकून आपल्या मनोगतातून श्रद्धांजली अर्पण केली.
अस्थीकलश दर्शनासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ.अशोक बिहाडे,रजीया पटेल, बाळासाहेब सावरकर,प्रकाश उगले पाथर्डी,अरविंद गी-हे सर, नंदकिशोर निमकर्डे (उपसरपंच बेलखेड), उद्यानपंडित गजानन वानखडे,सतीश इंगळे, गणेश मानमोडे सर, किशोर भोपळे साहेब, अशोक मानकर, अनिल बिहाडे सर, दिपक इंगळे, रवींद्र गि-हे, विजय जायले, अनंत सोनमाळे, संदीप खारोडे,अतुल ढोले, अशोक दारोकार, गोविंद चोपडे, डॉ.वानखडे,मोहन अंजनकर,सुनिता गी-हे,कोकीळा भोपळे,सविता वेरुळकार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश वेरुळकर, ओमप्रकाश उगले, पुरुषोत्तम मानकर, अंकुश रहाटे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष हरिदास भोपळे यांनी केले.
कोरोना चे सर्व नियम पाळून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.