अकोला : शहरातील जिजामातानगरातील रहिवासी श्रीधर शालिग्राम साटोटे नामक मजुराच्या आई-वडिलांसोबत कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून २६ एप्रिल रोजी रात्री आरोपी सुनील पांडुरंग काकडे व शोभा काकडे यांनी वृद्धा दाम्पत्याला घरातून ओढत आणून लोखंडी पाइप व काठ्यांनी गंभीर मारहाण केली.
श्रीधर साटोटे हा आवरण्यास गेला असता, त्यालाही जबर मारहाण केली. जखमींवर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.
तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला; परंतु एक महिन्यापासून आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. या दोन्ही आरोपींचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. सदर आरोपींचा शोध घेणे सुरू असून सदर एक आरोपी हा बँक कर्मचारी असल्याने संबंधित बँकेलासुद्धा याबाबत अवगत केले आहे.