अकोला शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहणारे व 24 तास अकोला जिल्ह्यातील व अकोला पूर्व मतदारसंघात नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी संघर्षशील नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला जिल्ह्यातील 51 महसूल मंडळात पिक विमा कंपनीकडून पंतप्रधान पिक योजना अंतर्गत सोयाबीन तसेच मुंग पिकाची नुकसानभरपाई देण्यात आली नाही याबाबत अकोला जिल्हा कृषी अधीक्षक व विभागाचे अधिकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या वर अन्याय सहन केला जाणार नाही व त्वरित न्याय द्यावा यासाठी शेतकऱ्यांच्या तक्रारी फेरमूल्यांकन साठी जिल्हा समन्वय समिती समोर मांडून न्याय द्यावा अशी मागणी केली
अकोला जिल्ह्यात खरीप २०-२१ ठकरिता विमा कंपनी कडून सोयाबीन मुंग पिक विमा रकमे पासून शेतकरी वंचित – असल्याच्या तक्रारी आमदार सावरकर यांच्याकडे प्राप्त झाल्यावर आज आमदार . रणधीर सावरकर यांनी विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषी खात्याचे अधिकारी यांचे सोबत संयुक्त बैठकीत आढावा घेऊन विमा जिल्हा तक्रार समिती समोर प्रकरण फेर आढाव्यासाठी ठेवण्याच्या सूचना केल्या.
विमा कंपनी कडून पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत मागील वर्षात सोयाबीन पिकास जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळापैकी फक्त एका महसूल मंडळात नुकसान भरपाई देण्यात आली. या बाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी आ. सावरकर यांचेकडे आल्यानंतर आमदार रणधीर सावरकर यांनी कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह आढावा घेऊन विमा वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारी फेर मूल्यांकनासाठी जिल्हा समिती समोर मांडण्याच्या सूचना केल्या. खरीप हंगाम २०२०-२१ करिता कृषी विमा कंपनी कडून (HDFC) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी देण्यात येणारी मोबदला रक्कम नुकतीच जाहीर करण्यात आली. विमा रक्कम मंजूर करतांना शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्यात. जिल्ह्यात ५२ महसूल मंडळांतर्गत फक्त पंचगव्हान या महसूल मंडळांतर्गत सोयाबीन पिकास विमा राशी मंजूर केली. तर इतर मंडळांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून नुकसान भरपाई न दिल्या गेल्याने विमा कंपनीच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित करून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल या करिता विमा कंपनी व कृषी विभागाचे अधिकारी यांना सुचना दिल्या.
जिल्ह्यात मुग पिकाचे १०० टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून १०० टक्के नुकसानभरपाई अपेक्षित असतांना विमा कंपनी कडून प्रत्यक्षात ९० टक्के रक्कम मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे मागील वर्षी मुग पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण मुग पिक नष्ट झाले असले तरी १० टक्के पिक शेतकऱ्यांना झाल्याचा शोध विमा कंपनी कडून लावण्यात आला. मुग पिक प्रत्यक्षात काढणीस आले नसल्याने सदर पिक कापणीचा प्रयोगच करणे शक्य झाले नसतांना शेतकऱ्यांना १० टक्के उत्पादन कसे झाले असा प्रश्न आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला असता विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही समर्पक उत्तर न मिळाल्याने विमा कंपनीचा मनमानी व बेताल कारभार उघड आमदार सावरकर यांनी पाडला. जिल्ह्यात एकूण ५२ महसूल मंडळे असून त्या पैकी ४१ मंडळात उडीद पिकास, २१ मंडळात कापूस ३७ मंडळात तूर, ३६ मंडळात ज्वारी अशी विमा राशी मंजूर करणायत येऊन इतर महसूल मंडळामध्ये विमा मोबदला देण्यात न आल्याने या सर्व पिकांचा व मंडळांचा नुकसान भरपाईसाठी ची तक्रार जिल्हा विमा तक्रार समिती समोर ठेवण्याच्या सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
व शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन विमा कंपनीने फक्त २२५० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. जिल्ह्यामध्ये सरसकट नुकसान झाले असतांना इतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई का दिल्या गेली नाही असा प्रश्न उपस्थित केला असता ४०८५ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे विमा कंपनी कडून सांगण्यात आले. किती शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोलफ्री नंबरवर तसेच विमा प्रतिनिधीच्या मोबाईल नंबरवर तसेच कृषी विभागाकडून विमा कंपनीस किती तक्रारी प्राप्त झाल्या याची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना आ. सावरकर यांनी विमा प्रतिनिधीस केली जेणेकरून शेतकऱ्यांना विमा राशी न्याय पद्धीतीने दिल्या गेली आहे किंवा नाही याची शहनिशा करता येईल.
जिल्ह्यात पातुर आलेगाव महसूल मंडळांतर्गत मुग पिकाच्या विमा रकमेची राशीच शेतकऱ्यांना दिल्या गेली नसल्याचे उघड झाले. या बाबत आ. सावरकर यांनी नाराजी व्यक्त करण्यासोबत तातडीने मोबदला देण्याच्या सूचना केल्या.जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये यासाठी अधिकारी व पीक विमा कंपनी यादीत अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे अन्यथा शेतकऱ्यांचा रोष झाल्यास त्याला जबाबदार आपण राहणार अशीही आमदार सावरकर यांनी आढावा बैठकीत बजावले बैठकीत तेजराव पाटील थोरात, तालुका अध्यक्ष अंबादास उमाळे, राजेश बेले, माधव मानकर, अभय थोरात, विनायक वैराळे, डॉ अमित कावरे इत्यादी सह कृषी खात्याचे अरुण वाघमारे, सांखीकीय अधिकारी करवा madam व HDFC आणि AIC विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.