• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अर्थकारण

सुरक्षित भविष्यासाठी इथे करा गुंतवणूक, सरकारी गॅरंटीसह मिळेल पोस्टाच्या बचत योजनांपेक्षाही अधिक व्याज

नोकरदार मंडळींकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात; पण जेव्हा आपल्याकडच्या उपलब्ध निधीवर अधिक रिटर्न्स/परतावा हवा असतो, तेव्हा स्वैच्छिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात Voluntary Provident Fund (VPF) हा पर्याय उत्तम ठरू शकतो.

Team by Team
May 20, 2021
in अर्थकारण
Reading Time: 1 min read
81 1
0
महिन्याला केवळ 1 रुपयाची गुंतवणूक करुन मिळवा 2 लाखांची पॉलिसी; सरकारच्या या योजनेसाठी घरबसल्या करा अप्लाय
36
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

नोकरदार मंडळींकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात; पण जेव्हा आपल्याकडच्या उपलब्ध निधीवर अधिक रिटर्न्स/परतावा हवा असतो, तेव्हा स्वैच्छिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात Voluntary Provident Fund (VPF) हा पर्याय उत्तम ठरू शकतो. भारत सरकारकडून प्रॉव्हिडंट फंड्सची सुविधा दिली जाते, जेणेकरून दीर्घ काळ गुंतवणूक करून आपल्या निवृत्तीपश्चात जीवनासाठी मोठा निधी उभा करता येऊ शकेल. त्यापैकीच एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड. त्यात गुंतवणूक करून चांगलं व्याज मिळवता येऊ शकतं. या प्रॉव्हिडंट फंडाचा मुख्य उद्देश असतो, तो म्हणजे लोकांना वृद्धावस्थेतल्या गरजांकरिता आवश्यक पैसे उभे करता यावेत. याला व्हॉलंटरी रिटायरमेंट फंड असंही म्हणतात.

VPF काय आहे?

हेही वाचा

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

Voluntary Provident Fund म्हणजे खरं तर Employee Provident Fund च (EPF) असतो. पण याचं वेगळेपण म्हणजे ‘ईपीएफ’व्यतिरिक्त यात कर्मचाऱ्याला आपल्या रिटायरमेंट फंडसाठी अधिक रकमेचं योगदान करण्याची परवानगी दिली जाते. ‘व्हीपीएफ’मध्ये व्याजदर ‘ईपीएफ’प्रमाणेच असतो. चालू आर्थिक वर्षासाठी ‘ईपीएफ’च्या व्याजदरात कोणताही बदल न करता तो 8.5 टक्क्यांवर कायम राखण्यात आला आहे. हा व्याजदर छोट्या बचत योजनांवर (Small Savings Scheme) दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या तुलनेत खूप अधिक आहे. छोट्या बचत योजनांमध्ये बँक एफडी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट, पीपीएफ, प्रधानमंत्री वय वंदन योजना आदींचा समावेश होतो.

मिळते सरकारी गॅरंटी

या सगळ्या योजनांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्याजदराच्या तुलनेत ‘व्हीपीएफ’वरच्या गुंतवणुकीवर दिला जाणारा व्याजदर खूप जास्त आहे. शिवाय या योजनेतल्या गुंतवणुकीला सरकारी हमीही मिळते. म्हणूनच ‘व्हीपीएफ’मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञांकडून दिला जातो.

‘व्हीपीएफ’मध्ये करण्यात आलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर अधिनियम ’80 सी’अंतर्गत करसवलतही मिळते. या गुंतवणुकीवर मिळालेल्या व्याजावरही कर द्यावा लागत नाही. किमान पाच वर्षं गुंतवणूक ठेवली आणि पाच वर्षांनी मॅच्युरिटीनंतर पैसे काढले, तरीही त्यावर कर द्यावा लागत नाही. यंदाच्या (2021) बजेटमध्ये केलेल्या नव्या तरतुदीनुसार ‘व्हीपीएफ’मध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास त्याच्या व्याजावर कर द्यावा लागतो.

छोट्या बचत योजनांचे व्याजदर दर तिमाहीला बदलतात. एक जुलैपासून सुरू होणार असलेल्या तिमाहीत हे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. ते व्याजदर पाहिले, की व्हीपीएफचा व्याजदर किती जास्त आहे, हे लक्षात येईल.

सध्याचे व्याजदर

सुकन्या समृद्धी योजना – 7.6 %

ज्येष्ठ नागरिक बचत योजना – 7.4 %

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड – 7.1 %

किसान विकास पत्र – 6.9 %

नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट – 6.8 %

मासिक प्राप्ती खातं – 6.6 %

Tags: providant fundसुकन्या समृद्धी योजना
Previous Post

खतांच्या किंमती पूर्ववत: शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी

Next Post

हवेत दहा मीटरपर्यंत पसरू शकतो कोरोना विषाणू; संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी

RelatedPosts

RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Nirmala Sitharaman
Featured

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

December 17, 2024
RBI
Featured

RBI चा बँकांना मोठा दिलासा, ‘CRR’ मध्ये कपात, सर्वसामान्यांना काय फायदा ?

December 6, 2024
rbi
Featured

रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम, RBI चा निर्णय

December 6, 2024
Nirmala Sitaraman
Featured

बँक खात्यात ४ नॉमिनी जोडता येणार, अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती

December 5, 2024
सोन्याचे बिस्किट
Featured

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले…!

May 31, 2024
Next Post
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

हवेत दहा मीटरपर्यंत पसरू शकतो कोरोना विषाणू; संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Telhara Police

कोरोना काळात खाकीचा वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हाथ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.