राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये उपव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सिव्हील अभियंत्यांसाठी भरती जाहीर केली आहे. NHAI Recruitment 2021 अंतर्गत उपव्यवस्थापक पदासाठी ४१ जागांसाठी भरती होणार आहे.
या ४१ जागा सिव्हिल अभियंतांसाठी असणार आहेत. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन दाखल करावं लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३९ हजार १०० रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मान्यता विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हील अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली असावी.
सिव्हील अभियांत्रिकी विषयातील GATE (Graduate Aptitude Test in Engineering) मध्ये गुण २०२१ च्या आधारे थेट उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसले पाहीजे. जे विद्यार्थी सिव्हिल अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात आहेत त्यांनाही अर्ज करता येईल.
ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांचा चालू असलेला ईमेल भरावा. कारण, एनएचएआयचे सर्व पत्रव्यवहार ईमेलद्वारे केले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी http://vacancy.nhai.org/vacancy/DMApplicationForm.aspx येथे क्लिक करा. उमेदवारांनी अर्ज २८ मे २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावा लागेल.
खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
फोटो, स्वाक्षरी, दहावीचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, सिव्हिल अभियांत्रिकीचे प्रमाणपत्र, गेट स्कोअर कार्ड. फॉर्म भरत असताना 1 MB पेक्षा कमी सर्व कागदपत्रे फक्त jpg, jpeg, png किंवा gif स्वरूपात अपलोड करावीत.