• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मान्सुन २०२१ पुर्व आढावा बैठक :कोविडच्या पार्श्वभुमिवर गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज रहाण्याचे निर्देश

Pre-Monsoon 2021 Review Meeting: Instructions to be equipped with village level systems

Team by Team
May 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
81 0
0
मान्सुन २०२१ पुर्व आढावा बैठक :कोविडच्या पार्श्वभुमिवर गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज रहाण्याचे निर्देश
13
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून मान्सूनपूर्व तयार करत असतांना यंदा या आपत्ती व्यवस्थापनाला कोविड संसर्गाची पार्श्वभूमी आहे. त्यादृष्टीने गाव ते जिल्हा मुख्यालय स्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्वतयारी करुन अधिक सतर्कतेने सज्ज रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाची मान्सून पूर्व तयारीची आढावा बैठक आज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीस  मुख्यालयातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे सहभागी झाले. तर ऑनलाईन पद्धतीने जिल्हाभरातून  सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग इ. सर्व विभागांचे महत्त्वाचे अधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

जिल्हाधिकारी पापळकर यांनी सहभागी अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना सांगितले की, यंदाची मान्सूनपूर्व तयारी करत असतांना कोविड संसर्गाच्या स्थितीचे भान राखून आपल्याला तयारी करावयाची आहे.  आगामी काळात कोरोना संसर्ग फैलावणार नाही याबाबतच्या उपाययोजना कायम राखून आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करावयाची आहे. त्यासाठी कोणत्याही कोविड रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडीत होऊन उपचार सुविधेत बाधा निर्माण होणार नाही, याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटचे कामही अव्याहतपणे सुरु राहिल, यासाठी वीज पुरवठा सुस्थापित करावा.

सर्व जुने, नवे पूल  यांची तपासणी करुन घ्यावी. पाटबंधारे विभागाने सर्व लहान मोठ्या प्रकल्पांच्या स्थितीची प्रत्यक्ष तपासणी करुन अहवाल सादर करावा. पूर व्यवस्थापनासाठी नदी काठावरील तसेच पूरप्रवण गावांमध्ये संपर्क यंत्रणा व खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पुरामुळे काठावरील रहिवाशांना स्थलांतरीत करावयाची वेळ आल्यास त्यांच्या पक्क्या निवाऱ्याची पर्यायी जागा, तेथे त्यांना द्यावयाचे भोजन, आवश्यक वैद्यकीय सुविधा, औषधांची उपलब्धता आदींचा साठा व पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उदयास येणाऱ्या  विविध साथींच्या आजारांच्या उपचारासाठी  वैद्यकीय सुविधांचा ॲक्शन प्लॅन तयार करावा. त्यासाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. शहरी भागात व मनपा हद्दीत नाले सफाईची कामे तातडीने पूर्ण करुन कुठेही पाणी तुंबणार नाही याची खातरजमा करावी. नदी पात्र वा नाल्यात अतिक्रमणे केलेल्या लोकांना तातडीने अतिक्रमणे हटवून तेथून सुरक्षित ठिकाणी हलवावे. आपत्ती निवारणासाठी पुरविण्यात आलेल्या साहित्याचे शोध व बचाव पथकाच्य्या शीघ्र कृतीदलाच्या सदस्यांना वाटप करावे. ते साहित्य संभाव्य आपत्तीच्या स्थळी वेळीच पोहोच करावे.

या काळात सर्व शासकीय यंत्रणांची संपर्क यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे.  त्यावरुन वेळचेवेळी संदेश व आवश्यक माहितीची देवाण घेवाण झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर असणाऱ्या नियंत्रण कक्षाचे येत्या दि.१ जून पासून २४X७ कार्यान्वयीत असणे आवश्यक आहे.   जिल्हा मुख्यालयाच्या संपर्कात नसणे हा एक गंभीर गुन्हा मानला जाईल,असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी सांगितले.

Tags: pre monsoon 2021 review meeting akola
Previous Post

कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स : बालकांच्या पुनवर्सनासाठी बाल कल्याण समितीकडे संपर्क साधा

Next Post

अकोला-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: जिल्हा उद्योग केंद्र

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोला-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: जिल्हा उद्योग केंद्र

अकोला-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: जिल्हा उद्योग केंद्र

health worker corona warrier

Akola Corona Cases: 282 पॉझिटीव्ह, 16 मृत्यू,477 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.