• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स : बालकांच्या पुनवर्सनासाठी बाल कल्याण समितीकडे संपर्क साधा

Team by Team
May 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स : बालकांच्या पुनवर्सनासाठी बाल कल्याण समितीकडे संपर्क साधा
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोवीड -१९ महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे पालनपोषण, यथायोग्य संरक्षण व संगोपनाच्या  दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा बालकांचा पुनर्वसनासाठी शोध घेऊन बाल कल्याण समितीकडे किंवा संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे माहिती देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी नितीन खंडागळे यांनी केले.

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बालकांच्या काळजी व संरक्षणाकरीता कृती दलाची बैठक आयोजीत करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुळकर्णी,  मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव राजेश देशमुख, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. सुनिल मानकर,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संगिता ठाकुर, सुनिल सरकटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सद्यस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे कोवीड-१९ बाधीत व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर परिणाम होत आहे.  त्यात काही बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता असते  तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता असते. बालकांचे शोषण होवू नये व त्यांचे संरक्षण व पालनपोषण व्हावे याकरीता अधिनियमान्वये कृती दल गठीत करण्यात आले आहे. या कृती दलामार्फत पालक गमावलेल्या बालकांचे पालनपोषण व संरक्षण करण्यात येणार आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मरसाळे यांनी याबाबत माहिती दिली की, आई किंवा वडील तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा कोरोनाची लागण झाली असल्यास अशा १८ वर्षाखालील बालकांची तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरुपाचे पुर्नवसनासाठी बाल कल्याण समितीकडे दाखल करावे. जेणे करुन अशा बालकांना बालगृहांमध्ये पुर्नवसन करण्यात येईल. जिल्हा व तालुकास्तरावर अशी बालके आढळुन आल्यास तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांचेशी संपर्क साधावा. किंवा  बालकांचे  हितचिंतक या नात्याने चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष सौ.पल्लवी कुळकर्णी (९७६३२८८८७०), संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर (८७६७७३१०७८),  चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये(९१४६६४४३५८), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर (९४२१४६४५६६) यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,  असे आवाहन  जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी  केले.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

ठिबक सिंचनच्या नळ्यांमधे अडकलेल्या दोन वन्यप्राणी काळविटास सुरक्षित रेस्क्यू करून जीवनदान

Next Post

मान्सुन २०२१ पुर्व आढावा बैठक :कोविडच्या पार्श्वभुमिवर गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज रहाण्याचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मान्सुन २०२१ पुर्व आढावा बैठक :कोविडच्या पार्श्वभुमिवर गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज रहाण्याचे निर्देश

मान्सुन २०२१ पुर्व आढावा बैठक :कोविडच्या पार्श्वभुमिवर गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज रहाण्याचे निर्देश

अकोला-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: जिल्हा उद्योग केंद्र

अकोला-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: जिल्हा उद्योग केंद्र

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.