• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ग्रामीण भागा ऑक्सिजन बेडची संख्या आवश्यकतेनुसार वाढवा-पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचे निर्देश

Team by Team
May 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
bacchu kadu
36
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : ग्रामीण रुग्णालय पातुर, बाळापूर, तेल्हारा व अकोट येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागात चाचण्या वाढवून जनजागृती मोहीम राबवा. जिल्ह्यात आता सर्वच तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारले जात असून ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील कोवीड केअर सेंटरला आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणेस दिले.

प्राथमिक रुग्णालयातील कोविड केअर सेंटर व ऑक्सीजन प्लांटची पाहणी दरम्यान ते बोलत होते. यावेळी विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, परभणी जिल्ह्यातील आ.राहूल पाटील, पातूर नगराध्यक्ष प्रभा कोथळकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, उपविभागीय अधिकारी घूगे,गटविकास अधिकारी, तहसिलदार आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

आमदार नितीन देशमुख यांच्या प्रयत्नाने पातुर येथील ग्रामीण आयुर्वेदीक महाविद्यालयात स्थापण्याट आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये 50 ऑक्सिजन बेडचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे कोरोना काळात बाधीत रुग्णांवर उपचार करणे सोईचे होणार असून या कामी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ना. कडू यांनी यावेळी केले. ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथील ऑक्सिजन बेडची पाहणी करून बेड संख्या वाढवण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना दिले.

ग्रामीण रुग्णालय तेल्हारा व अकोट येथील ऑक्सिजन बेडची पाहणी करून ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोना रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांना चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करा. तसेच ग्रामीण भागात कोविड रुग्णाची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णाकरीता आवश्यकतेनुसार ऑक्सीजन बेड उपलब्ध करावे. कमी संसर्ग असलेल्या रुग्णांना गृह अलगीकरण त्यांच्या घरी स्वतंत्र सुविधा असल्याची खातरजमा करूनच द्यावे. रुग्णास औषधी, मास्क, सॅनिटायजर या आवश्यक वस्तू असलेल्या कोरोना किट पुरवाव्या. तसेच रुग्ण कोरोना मुक्त होईपर्यंत त्यांच्या संपर्कात रहावे, असे निर्देश दिले. ग्रामीण भागातील व्यक्तिंनी अंगावर दुखणे न काढता व कोरोना लक्षण दिसताच चाचणी करुन घ्यावी,असे आवाहन ना. कडू यांनी यावेळी केले. यासाठी प्रशासनाद्वारे ग्रामीण भागात कोरोना विषाणूविषयी जनजागृती मोहीम राबवावी. तसेच रुग्णालयात उपलब्ध बेड, ऑक्सीजन बेडबाबत माहिती लोकांपर्यंत प्रसारित करावी.

ज्या गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण आल्यास ते गाव बंदिस्त करून त्याठिकाणी चाचण्या कराव्या. किराणा दुकान, भाजी विक्रेते व औषधी दुकानदारांचे चाचण्या करावे. नियमाचे पालन न करण्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश ना. कडू यांनी दिले.

अकोट ग्रामीण रुग्णालयात आयोजित बैठकीत लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेऊन जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व वयोवृद्धांना प्रत्येक रविवारी विशेष मोहीम राबवून लसीकरण करा. तसेच दुसरा डोस घेण्याऱ्या व्यक्तीना प्राधान्य द्यावे. लसीकरण केंद्रावर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्या. केंद्रावर अनावश्यक गर्दी होणार नाही याकरीता उपायोजना कराव्या. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाकरीता जनजागृती करुन लसीकरणाकरीता प्रोत्साहित करावे, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

Sarkari Jobs: 9 हजाराहून अधिक जागांसाठी मेगाभरती, इथे करा अर्ज

Next Post

ठिबक सिंचनच्या नळ्यांमधे अडकलेल्या दोन वन्यप्राणी काळविटास सुरक्षित रेस्क्यू करून जीवनदान

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
ठिबक सिंचनच्या नळ्यांमधे अडकलेल्या दोन वन्यप्राणी काळविटास  सुरक्षित रेस्क्यू करून जीवनदान

ठिबक सिंचनच्या नळ्यांमधे अडकलेल्या दोन वन्यप्राणी काळविटास सुरक्षित रेस्क्यू करून जीवनदान

कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स : बालकांच्या पुनवर्सनासाठी बाल कल्याण समितीकडे संपर्क साधा

कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स : बालकांच्या पुनवर्सनासाठी बाल कल्याण समितीकडे संपर्क साधा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.