तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तहसील कार्यालयावर तेल्हारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाडी यांच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ आणि खतांच्या वाढत्या किंमती विरोधात आंदोलन करण्यात आले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष श्री संग्रामभैय्या गावंडे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार तेल्हारा तालुका यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष श्री.प्रदिप ढोले सर जेष्ठ नेते श्री.पुंडलिकराव अरबट श्री.प्रशांत गेबड श्री.योगेश कोरपे सलीम भैय्या युवक तालुकाध्यक्ष गणेश कुकडे .चेतन नराजे .महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ पारसकर मॅडम शहर अध्यक्ष सौ श्रध्दा गढे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी घोषणा देत केंद्र सरकारच्या या नीतीचा जाहीर निषेध करण्यात आला हे सरकार शेतकऱ्यांचा जीव घेऊन गप्प बसंनार आहे का असा सवाल तालुकाध्यक्ष श्री ढोले सर यांनी प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केला