अकोला – दि.14 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2265 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1825 अहवाल निगेटीव्ह तर 440 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 845 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 13 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 219 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 49212(37433+11602+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 440+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 219= एकूण पॉझिटीव्ह- 659.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 236980 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 234009 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2581 नमुने होते. आजपर्यंत एकूण 236886 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 199453 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
440 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 440 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 190 महिला व 250 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-29, अकोट-78, बाळापूर-33, तेल्हारा-36, बार्शी टाकळी-25, पातूर-57, अकोला-182. (अकोला ग्रामीण-41, अकोला मनपा क्षेत्र-141)
दरम्यान काल (दि. 13) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 219 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
570 जणांना डिस्चार्ज
दरम्यान दि.14 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16, गोयका हॉस्पीटल येथील 15, केअर हॉस्पीटल येथील सहा, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, लोहाणा हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील 17, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, मुलांचे वसतीगृह येथील आठ, मुलांचे वसतीगृह मुर्तिजापूर येथील तीन, ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील सहा, आयकॉन हॉस्पीटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील चार, देवसार हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील चार तर होम आयसोलेशन मधील 446 असे एकूण 570 जणांना डिस्चार्ज देण्यात आला., अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
13 जणांचा मृत्यू
दि.14 दिवसभरात 13 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बार्शीटाकळी येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पाटी दहिहांडा येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, पिंपरी खु. ता. अकोट येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, अशोक नगर येथील 40 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते. वाडेगाव ता.बाळापूर येथील 80 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, तर मजलापूर दापोरा येथील 80 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते. रणपिसे नगर येथील 74 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 35 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, वाडी ता.तेल्हारा येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते, तेल्हारा येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, बोर्डी ता.अकोट येथील 80 वर्षीय पुरुष रुग्णास दि.7 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट फैल येथील 71 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ येथील 85 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 4 मे रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6785 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 49212(37433+11602+177) आहे. त्यात 864 मृत झाले आहेत. तर 41563 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6785 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.