तेल्हारा (आनंद बोदडे )- तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपुर जाफरपुर गावातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण लस उपलब्ध करून घ्यावी अशी मागणी वाडी अदमपूर ग्रामपंचायत सरपंच रुपेश राठी यांनी तहसीलदारांना 13 मे रोजी निवेदन देऊन मागणी केली आहे. कोरोना संसर्गची दुसरी लाट आली असून कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सरपंच रुपेश राठी यांनी गावातील नागरिकांमध्ये लसीकरणा बाबत जागृता निर्माण केली. परंतु बरेच दिवसा पासुन गावातील लसीकरण बंद आहे .
तसेच ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. नागरिक लस घेण्यासाठी सरसावले असताना लस अभावी प्रतीक्षा करावी लागत आहे .तसेच गावातील 18 ते 40 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचे सोयी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे वाडी अदमपुरगट ग्रामपंचायत सरपंच रुपेश राठी यांनी बुधवारी तेल्हारा तहसीलदारांना व गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.