तेल्हारा(आनंद बोदडे )- तेल्हारा तालुक्यामध्ये ग्रमीण भागामध्ये पॉ झीटीव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता आनखी एक दोन,कोवीड केअर सेंटर चालु करण्यात यावे तसेच कोरोना व्यतिरिक्त ईतर आजारावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात यावे अशी मागणी तहसिलदार डॉ संतोष येवलीकर यांचेकडे ईसापुर ग्रामपंचायत चे सरपंच मिराताई बोदडे यांणी आज घेण्यात अलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे केली आहे या सभेला प्रबोध देशपांडे उपविभागीय अधिकारी अकोट , डॉ . संतोष येवलीकर तहसिलदार तेल्हारा भारत चव्हाण गटविकारी, लिंबाजी बारगीरे सहाय्यक गटविकास अधिकारी व ग्राम दक्षता समीती चे सदस्य सरपंच तलाठी ग्रामसेवक आशा वर्कर अंगनवाडी सेविका , कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या सभेमध्ये उपविभागीय आधिकारी अकोट व तहसिलदार डॉ .संतोष येवलीकर यांणी ग्राम दक्षता समीतीचे सदस्य तथा सरपंच ,उपसपंच , तलाठी ग्रामसेवक यांचेकडुन समस्या जानुन घेतल्या असुन त्यावर उपाय योजना करण्यात येईल असे सांगीतले तसेच ईसापुरचे सरपंच यांणी उपस्थित केलेल्या मुद्यावार रुग्णालयाचे अधिकारी यांणा तश्या प्रकारच्या सुचना देण्यात येतील असे सांगीतले तसेच शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन व्हावे या करीता ग्राम दक्षता समीतीने पुढाकार घ्यावा तसेच गावामध्ये जमाव होणार नाही याची सुध्दा ग्राम दक्षता समीतीने काळजी घ्यावी असे सांगीतले