वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील युवकाने अकोला वाडेगाव रस्त्यावची मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याबाबत तो रस्ता व्यवस्थित दुरुस्ती न झाल्यास १० मे सोमवार रोजी आत्मदहनाचा इशारा कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदन द्वारे करण्यात आला आहे.
अकोला वाडेगाव रस्त्याबाबत २० एप्रिल रोजी रस्त्याच्या दुरावस्थे बाबतीत सविस्तरपणे निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात रस्त्याच्या दुरुस्तीचे दिनांक १० मे सोमवार पर्यंत काम करण्याची मागणी केली होती.याच रस्त्यावर आज रोजी साधी सायकल सुद्धा चालविता येत नसल्याने ग्राम्सथ त्रस्त झाले आहेत.रस्त्यावर नेहमी धुळीचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.यावर अनेकांचा अपघात होऊन अपंगत्व आले तर काहींना जीव गमवावा लागला आहे यामुळे प्रशासना यंत्रणेवर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आत्मदहनाचा इशारा करन्यात येणार असल्याचे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे .तर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परीसरातील नागरीकांनी वेळोवेळी मागणी केली असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काहीच हालचाली होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे.या सर्व बाबतीत प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून वअश्वसन देण्यात आले आहे .