अकोला,दि.9- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2294 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1744 अहवाल निगेटीव्ह तर 550 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 539 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 12 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 212 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 45800(35036+10587+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 550+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 212= एकूण पॉझिटीव्ह- 762.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 225928 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 222986 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2555 नमुने होते. आजपर्यंत एकूण 225801 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 190765 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
550 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 550 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 280 महिला व 270 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-61, अकोट-102, बाळापूर-27, तेल्हारा-13, बार्शी टाकळी-38, पातूर-37, अकोला-272. (अकोला ग्रामीण-52, अकोला मनपा क्षेत्र-220)
दरम्यान काल (दि. 8) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 212 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
539 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 31, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील चार, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील सहा, समाज कल्याण वसतीगृह येथील आठ, केअर हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील 450 असे एकूण 539 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
12 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 12 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पातूर येथील 70 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर नाका येथील 24 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 29 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, जीएमसी क्वॉटर येथील 69 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 2 मे रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर डोंगरगाव येथील 69 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, बाळापूर येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते. कौलखेड येथील 58 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते. खदान येथील 59 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट येथील 45 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, कवसा ता.अकोट येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 8 रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, कामखेड ता.पातूर येथील 61 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. हा रुग्ण मलकापूर येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 21 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
6564 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 45800(35036+10587+177) आहे. त्यात 799 मृत झाले आहेत. तर 38437 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6564 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.