• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, October 16, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

खरीप हंगाम २०२१ नियोजन सभा:४ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

Team by Team
May 7, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
खरीप हंगाम २०२१ नियोजन सभा:४ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन
13
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- खरीप हंगाम २०२१ करीता  जिल्ह्यात चार लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाखाली दोन लाख ९१०० हेक्टर क्षेत्र असून  कापूस पिकाखाली  एक लाख ४७ हजार  हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व वाजवी दरात तसेच थेट बांधावर बियाणे, खते, किटकनाशके इ. कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी यंत्रणेस दिले.

हेही वाचा

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या आजच्या या बैठकीस विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावर,  कृषी उपसंचालक अरुण वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत,  महाबीज विभागीय व्यवस्थापक  जगदिशसिंग खोकड, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेराणीया आदी अधिकारी सहभागी झाले होते.

आ. गोवर्धन शर्मा म्हणाले की, शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे, खते, किटकनाशके यांचा पुरवठा व्हावा, त्यादृष्टीने खरीप हंगामाचे नियोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आ. हरिष पिंपळे यांनी सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता होण्याबाबत खातरजमा करुन घ्यावी अशी सुचना केली. शेतकऱ्यांना बियाणे सहज उपलब्ध व्हावे. दुर्दैवाने दुबार पेरणीची वेळ आली तरी त्यासाठीचे नियोजन असावे अशी मागणी त्यांनी केली.

आ. रणधीर सावरकर यांनी पिककर्ज वाटप व पिक विमा या संदर्भात शेतकऱ्यांना तात्काळ सुविधा पुरविल्या जाव्या. त्यांना विनाकारण हेलपाटे घालावे लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच गहू खरेदी केंद्रांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही केली.

आ. अमोल मिटकरी यांनी सोयाबीनच्या बियाण्यांचा पुरवठ्याबाबत, कपाशी वरील बोंड अळी रोखण्यासाठीच्या काय उपाययोजना केल्या आहेत, खताची साठेबाजी रोखण्यासाठी  तसेच थेट बांधावर खते पोहोचविण्याबाबत नियोजन करावे असे मुद्दे मांडले.

 या बैठकीस मार्गदर्शन करतांना ना. कडू म्हणाले की, सोयाबीन लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरचे बियाणे वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी तसेच सोयाबीन पेरणीबाबत तांत्रिक तपशील हा अधिक सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. त्यासाठी व्हिडीओ तयार करुन समाजमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.  तसेच सोयाबीन सोबत आंतरपिकेही घ्यावी.  शासनाने सोयाबीन लागवडीबाबत जारी केलेला चतुःसुत्री कार्यक्रम  अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे सांगितले.  शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपासाठी नियोजन करावे.  तसेच बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी  कृषी सेवाकेंद्रांमार्फत  होणाऱ्या पेरणीचे नियोजन करुन बियाण्यांचे वितरण व्हावे.

प्रत्येक गावात कृषी सेवक हजर असले पाहिजे यासाठी कृषी सेवकांचे कार्यक्रम जाहीर करा. तसेच खते बियाणे यांच्या वाजवी दरात उपलब्धतेबाबतही प्रशासनाने नियोजन करुन दरांवर नियंत्रण ठेवावे.

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण  करण्यासाठी कापूस लागवड ही  एक जून नंतर होणे अपेक्षित आहे. त्यासाठी बियाण्यांचे वितरणही एक जून नंतर करावे, अशी सुचनाही करण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रचार व प्रसार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

खरीप हंगाम नियोजनातील महत्त्वाचे मुद्दे

पिकनिहाय क्षेत्र – सोयाबीन- दोन लाख ९१०० हेक्टर, कापूस एक लाख ४७ हजार हेक्टर,  तूर ५१ हजार २०० हेक्टर, मूग-३५ हजार १५० हेक्टर, उडीद- १६ हजार १२५ हेक्टर, ज्वारी-८७०० हेक्तर, मका २८५ हेक्टर, असे जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन आहे.

बियाणे उपलब्धता- सोयाबीन पिकासाठी एक लाख ५६ हजार ८२५ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ३२ हजार २९९ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. त्यापैकी २८ हजार क्विंटल महाबीज व कृभको मार्फत तर खाजगी उत्पादकांकडून ५९९९ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तर शेतकऱ्यांकडे एक लाख ६७ हजार १५६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.  कापूस पिकासाठी ३६७५ क्विंटल (७ लाख ३५ हजार पाकिटे)  बियाणे लागणार असून  हा पुरवठाही खाजगी उत्पादकांकडून ३६६६ व्किंटल तर महाबीज कडून नऊ क्विंटल  बियाणे उपलब्धता होणार आहे.  तूर पिकासाठी २६८८ क्विंटल बियाण्याची मागणी असून महाबीज मार्फत २१०० क्विंटल महाबीज तर खाजगी उत्पादकांकडून  ५८८ क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार आहे.

खतांची उपलब्धता- जिल्ह्यात ९५ हजार ७०० मेट्रीक टन खतांची  मागणी असून जिल्ह्याला ७७ हजार ९९० मेट्रीक टन  आवंटन मंजूर आहे. गत वर्षीचे १८ हजार ६९६ मेट्रीक टन खत शिल्लक असून खतांचे आवंटन उपलब्ध होत आहेत.

Tags: akola newsAkola news in Marathiखरीप हंगाम २०२१
Previous Post

PUBG खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PUBG भारतात सुरू होणार; Battlegrounds Mobile India असणार नवीन अवतार

Next Post

पोलीस, महसूल आणि ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

RelatedPosts

Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम
Featured

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025
अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव
Featured

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ
Featured

प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शुभारंभ

October 6, 2025
सरकारी लॅबमधील चाचणीनंतरच होणार कफ सिरपची निर्यात १ जूनपासून नवीन नियम लागू
Featured

कोल्ड्रिफ सिरपबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन वितरणास मनाई

October 6, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
Next Post
Collector Akola

पोलीस, महसूल आणि ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

India Post GDS Recruitment 2020 : दहावी पास उमेदवारांना पोस्टात ४ हजार २६९ जागांची भरती

Indian Post Recruitment – दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागात भरती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

अग्निवीर योजनेत होणार महत्त्वपूर्ण बदल! भारतीय लष्कराचा प्रस्ताव

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

October 10, 2025
सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा अन्न पदार्थ उत्पादक पेढ्यांच्या तपासणीसाठी ‘एफडीए’ची मोहिम

October 14, 2025

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.