मुंबई : दूरसंचार उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुढील 3 महिन्यांमध्ये भारतात 5G नेटवर्क सुरु होऊ शकतं. परंतु ते केवळ मर्यादित क्षेत्रात असेल. या तंत्रज्ञानास गरजेचा असं ऑप्टिकल फायबर आधारित इन्फ्रास्ट्रक्चर अद्याप तयार नाही. नोकिया इंडियाच्या मार्केटिंग अँड कॉर्पोरेट अफेयर्स विभागाचे प्रमुख अमित मारवाह म्हणाले की, 5 जी सर्व्हिस नेटवर्कबाबत भारताला निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा भारत पुढच्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या फायद्यापासून वंचित राहील. (5G network can start in 3 months in India but infrastructure not ready in India)
मारवाह म्हणाली, “जर आपण लवकरच 5G सुरू न केल्यास आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप मागे राहू. 5 जी ऑपरेटरसाठी पैसे कमविण्यासाठी विक्री चॅनेल्स आपल्याकडे उपलब्ध नाहीत. देश आणि जगात नवीन आर्थिक मूल्य निर्मितीसाठी ही काळाची गरज आहे. टेलिकॉम एक्सपोर्ट अँड प्रमोशनल काऊन्सिलचे अध्यक्ष संदीप अग्रवाल म्हणाले की, भारताने 5 जी मध्ये स्थानिकरित्या उत्पादित उपकरणांचा वापर करावा, यावर भर दिला जावा. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव भारताचे यावर नियंत्रण असले पाहिजे.
दूरसंचार क्षेत्र कौशल्य परिषदेचे अरविंद बाली म्हणाले की, संपूर्ण तंत्रज्ञान देश स्वतः तयार करु शकत नाही किंवा निर्माण करु शकत नाही. त्याला इतरांचा आधार घ्यावा लागेल. ते म्हणाले की, प्रॉडक्शन बेस्ड इन्सेंटिव्ह स्कीम ही योजना भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने योग्य दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे.
Nasscom च्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि टेक महिंद्राचे मुख्य धोरण अधिकारी जगदीश मित्रा म्हणाले की, कोरोना साथीच्या रोगाने सर्व देशांना नव्या तंत्रज्ञानाचा विचार करण्यास भाग पाडले आहे. सर्व देशांना आता निर्णय घ्यावा लागेल की, आपल्यासाठी काय योग्य आणि काय चुकीचे आहे. मित्रा म्हणाले की, भारतीय बाजारामध्ये अशा बर्याच संधी आहेत ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आपण भारतात एखादे तंत्रज्ञान तयार केल्यास, निर्माण केल्यास आपण ते निर्यातदेखील करू शकतो.
सध्या या दोन शहरांत 5G चे टॉवर
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात या कंपन्यांनी नागरिकांना 5 जी इंटरनेट सेवा देण्यासाठी काम सुरु केलं आहे. मात्र, 2022 पर्यंत ही सेवा सुरु होण्याची शक्यता नाही. सरकारने 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव न केल्यामुळे ही प्रक्रिया रखडलेली आहे. Ookla या ग्लोबल नेटवर्क मोजणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एअरटेल आणि जिओ ने भारतातील 2 शहरात 5 जी सेवा देणारे टेस्टींग टॉवर लावले आहेत.
जगात एकूण 21996 5 जी टॉवर्स
Ookla ने दिलेल्या माहितीनुसार देशातील मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांत 5 जी टॉवर लावण्यात आले आहेत. हे टॉवर्स टेस्टींगसाठी लावले आहेत. सध्या जगात 5 जी चे एकूण 21, 996 टॉवर्स आहेत. त्यातील दोन भारतात आहेत. Ookla ने सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही टॉवर्स हे टेस्टींग फेजमधील आहेत. याविषयी अधिक माहिती देताना हैदराबाद येथील 5G ची टॉवरची टेस्ट पूर्ण करण्यात आल्याचे भारती एअरटेलने जानेवारी महिन्यात सांगितलं आहे.
दूरसंचार विभागाने नुकतंच 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाचे आयोजन केले होते. या लिलावात प्रीमियम 700 MHz बँड अजूनही विकले गेलेले नाहीत. सध्या 35 पेक्षा जास्त देशात 5 जीची सेवा सुरु आहे. मात्र, 5 जीची सेवा भारतीयांपासून अजून 8 महिने दूर आहे असे सांगितले जात आहे.