तेल्हारा ( आनंद बोदडे )– तेल्हारा नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या गाडगे महाराज सभागृहामध्ये कोवीड सेंटर ठेवण्या बाबत प्रशासनाच्या हालचाली दिसुन येत असुन या सभागृहाच्या तिनही बाजुने लोक वस्ती आहे तसेच नागरीकांची व लहान मुलांची वर्दळ असल्यामुळे सदर कोवीड सेटर या सभागृहामध्ये घेतल्यास नागरीका़ंना त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर सेंटर ज्या ठिकाणी लोकवस्ती नसेल अश्या ठिकाणी घेण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार विजय सुरळकर आणी नगरपरिषद तेल्हारा यांणा देण्यात आले असुन निवेदनाचा विचार न झाल्यास वेळ प्रसंगी रस्यावर उतरण्याचा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे.
या निवेदनावर विकास पवार नगरसेवक गोवर्धन पोहरकार, अशोक दारोकार. गौतम दामोदर संतोष मेश्राम, आर्जुन सोनोने मारोती चव्हाण, बाळासाहेब मेश्राम, कैलास पोहरकार यांच्या सह्या आहेत