• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोनानंतर सतावतोय म्युकर मायकॉसिस!

Team by Team
May 6, 2021
in Corona Featured, आरोग्य
Reading Time: 1 min read
84 1
0
दुसर्‍या लाटेतील कोरोना वेगाने करीत आहे फुफ्फुसांचे नुकसान
13
SHARES
604
VIEWS
FBWhatsappTelegram

राज्यात कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांपुढे म्युकर मायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे (फंगल इन्फेक्शन) नवे संकट उभे राहत आहे. या आजारावरील उपचारासाठी महागड्या औषधांचा आधार घ्यावा लागत असून संबंधित औषधांचा साठाही बाजारातून संपल्यामुळे गंभीर आजाराशी एक झुंज देऊन मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडलेल्या रुग्णांवर नवी झुंज देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

या आजारावर उपयुक्‍त ठरणार्‍या औषधांचा मुबलक साठा वेळीच उपलब्ध केला नाही, तर रुग्णांच्या नातेवाईकांना औषधासाठी रेमडेसिवीरसारखी धावपळ नशिबी येऊ शकते. कोरोनावरील उपचार पद्धतीत वापरण्यात येणार्‍या उत्प्रेरके (स्टेरॉईडस्), रेमडेसिवीर औषधांचे रुग्णांवर दुष्परिणामही जाणवत आहेत. यामध्ये फुप्फुसाचे स्नायू कठीण होणे (लंग्ज् फायब्रॉसिस) हा आजार निदर्शनास आला होता.

हेही वाचा

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

आता त्यापाठोपाठ म्युकर मायकॉसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या आजारावर अ‍ॅम्फोटेरेसिन या बुरशीविरोधी (अँटी फंगल) औषधाची मात्रा आजाराची तीव्रता आणि रुग्णाचे वजन विचारात घेऊन दिली जाते. एका रुग्णाला सरासरी 50 मि. ग्रॅ. क्षमतेच्या किमान 50 ते 60 इंजेक्शनच्या कुप्या देण्यात येतात. एका कुपीची किंमत 2 हजार ते 8 हजार रुपये आहे. याचाच अर्थ एका रुग्णाला या आजारातून सुटका करून घेण्यासाठी किमान 1 ते 4 लाख रुपये केवळ औषधांवर  खर्च करावे लागतात. हा खर्च रेमडेसिवीर, टोसिलझुमॅब या औषधांच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. सर्वसामान्यांना न पेलवणारा खर्च आणि बाजारातील औषधांची टंचाई लक्षात घेता शासन स्तरावर या औषधांच्या साठ्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक बनले आहे. मधुमेहग्रस्त कोरोना रुग्णांना हा आजार होत असल्याचे निरीक्षण आहे. असे रुग्ण कोरोनामुक्‍त झाल्यावर त्यांच्या नाकाच्या पोकळ्यांमध्ये (पॅरानेझल सायनसेस)हा बुरशीजन्य आजार जमा होतो. तेथून तो डोळे, मेंदू या अवयवांमध्येही पसरतो.

अशा आजार झालेल्या रुग्णांच्या चेहर्‍यावर सूज येणे, डोळे सुजणे, द‍ृष्टी अंधूक होणे, तीव्र डोकेदुखी, दात ठिसूळ होणे अशी लक्षणे दिसतात. नाकाचा सीटी स्कॅन काढला, की आजारावर तत्काळ शिक्‍कामोर्तब करणे सोपे होते. अशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी तत्काळ उपचार करून घेणे आवश्यक आहे. भारतामध्ये अ‍ॅबॉट इंडिया, सन फार्मा, भारत सिरम, मायलान, सिप्ला, इन्टास फार्मा, सेलॉन, कॅडिला फार्मा आदी कंपन्या अ‍ॅम्फोटेरेसिन बनवतात. त्यांच्या उत्पादनांच्या किमती निरनिराळ्या आहेत. केंद्र सरकारने किंमत नियंत्रणाखाली आणली, तरी त्याचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

Tags: corona side effectम्युकर मायकॉसिस
Previous Post

महाराष्ट्र एटीएसकडून मोठी कारवाई, २१ कोटींचे युरेनियम जप्त, दोघांना मुंबईत अटक

Next Post

या दोन कारणांमुळे नाकारण्यात आले मराठा आरक्षण

RelatedPosts

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Featured

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

January 6, 2025
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Featured

कोरोनानंतर जगापुढे नवे संकट…! ‘ब्लिडिंग आय’ विषाणूचा 17 देशांत फैलाव, 15 जणांचा बळी

December 3, 2024
ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?
Featured

ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

November 7, 2024
औषधांवर बंदी
Featured

पॅरासिटामॉलसह 53 औषधे दर्जा तपासणीत फेल

September 26, 2024
Ambulance
Featured

तेल्हारा तालुक्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

July 4, 2024
Next Post
मंत्रिमंडळ निर्णय : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार

या दोन कारणांमुळे नाकारण्यात आले मराठा आरक्षण

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! मॉन्सून १ जूनला केरळमध्ये धडकणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.