जीवन विमा पॉलिसीत मिळणारी भरपाई भरभक्कम असते. जर विमा कंपन्या अशा प्रकारच्या जोखमींच्या अर्जदारांना मान्यता देऊ लागले, तर त्यांचा दावा मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. कोरोनाची बाधा झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतरही अनेकांमध्ये मेडिकल कॉम्प्लिेक्शन्स होऊ शकतात.
आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसीच्या प्रकरणात विमा कंपन्या अर्जदाराच्या जोखमीची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त चाचणी करण्यास सांगत आहेत. कोविडमधून बरा झालेला कोणताही व्यक्ती तीन महिन्यांनंतर कोविड निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न होत असेल, तर विमा कंपन्यांची जोखीम कमी समजली जाते. या आधारावर भविष्यात कोणताही दावा करण्यास सुलभता येते. पण गेल्या काही काळात कोरोनातून बरे झालेल्या लोकांना अनेक प्रकारचे आजार उद्भवल्याचे आढळून आले आहे. यात काही धोकादायक आजारही बळावल्याचे दिसून आले आहे. जीवन विमा पॉलिसीत मिळणारी भरपाई भरभक्कम असते. जर विमा कंपन्या अशा प्रकारच्या जोखमींच्या अर्जदारांना मान्यता देऊ लागले, तर त्यांचा दावा मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. कोरोनाची बाधा झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतरही अनेकांमध्ये मेडिकल कॉम्प्लिेक्शन्स होऊ शकतात. या कारणामुळेच विमा कंपन्या नव्याने पॉलिसी खरेदी करणार्यांना अर्ज करण्यापूर्वी चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना पॉलिसी काढण्यासाठी एक ते तीन महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. अर्थात ही बाब संसर्गाच्या गांभीर्यावर अवलंबून आहे.