अकोला – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत दि. २२ एप्रिल पर्यंत नोंदीत बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या मान्यतेनुसार कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भाव कालावधीत १५०० रुपयांचे अर्थ सहाय्य देण्याचे घोषीत केले आहे. त्यानुसार मंडळाकडे जुलै २०२० ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांपैकी ज्यांची नोंदणी फी व वर्गणी मंडळाकडे लॉकडाऊनमुळे जमा करणे शक्य झाले नाही, अशा बांधकाम कामगारांना मंडळाचे स्मार्ट कार्ड देता आले नाही. अशा कामगारांनी त्यांची नोंदणी फी पंचवीस रुपये व वर्गणी फी बारा रुपये खाली दिलेल्या मंडळाच्या दोन स्वतंत्र खात्यात जमा करावे, असे आवाहन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी केले आहे.
बाब | रक्कम रुपये | बँकेचे नाव | बँकेचे खाते क्रमांक | IFS C Code |
नोंदणी फी | २५/- | सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई | 3230821864 | CBIN0282611 |
वर्गणी/ नुतणीकरण | १२/- | सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई | 3143044488 | CBIN0282611 |
बांधकाम कामगारांनी फी चा भरणा केल्यानंतर www.mahabocw.in उघडल्यानंतर याबाबत सुचना दिसुन येईल. सुचनेच्या खाली “ पैसे भरल्यानंतर येथे क्लिक करावे ” असे बटन दिलेले आहे. त्यावर क्लिक करुन फि भरल्याबाबतची सविस्तर माहीती सादर करावी. अकोला जिल्ह्यातील कामगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने यांनी केले आहे.