• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘लिंकींग’ करुन विक्री करणाऱ्या खतविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Team by Team
April 26, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
Collector Akola
18
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –  खरिप हंगामाच्या तयारीचा भाग म्हणून शेतकरी बियाणे, खतांची खरेदी करत असतात. या पार्श्वभुमिवर शेतकऱ्यांना खते विक्री करतांना विक्रेते हे ‘लिंकींग’ करुन अनावश्यक खतेही बळजबरी खरेदी करावयास लावतात, तेव्हा खते खरेदी करतांना लिंकींग करुन विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास, अशा विक्रेत्याविरुद्ध जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अन्वये तातडीने कारवाई करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज  संबंधित यंत्रणांना दिले.

यासंदर्भात आज जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी  जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी श्रीकांतप्पा खोत,  सहा. व्यवस्थापक पणन सचिन कातखेडे,  विभागीय व्यवस्थापक महाबीज जगदिशसिंह खोकड,  जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, प्रभाकर मानकर, सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, शेतकऱ्यांना अनावश्यक खत खरेदी करावयास लावू नये. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार तर सहन करावा लागतोच अनावश्यक खते जमिनीत गेल्यास जमिनीचे आरोग्यही बिघडते. तरी खते विक्रेत्यांनी खतांची विक्री करतांना लिंकींग करु नये.  अशा प्रकारे कुणी खत विक्रेता बळजबरीने लिंकींग करण्यास भाग पाडत असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रार करावी.

खतांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सध्या जो खतांचा साठा उपलब्ध आहे, तो  जुन्या दरातील खतांचा आहे. त्यामुळे या खतांची विक्री सुद्धा जुन्या दरानेच झाली पाहिजे, याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष ठेवावे,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांनी जुन्या दराने खत खरेदी करावी,असे आवाहन ही करण्यात आले. जिल्ह्यात बियाणे व खतांच्या अधिकृत विक्रेते होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेऊन गुंतवणूक करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना त्यांच्या गावात बियाणे व खते उपलब्ध होऊ शकतील.

जिल्ह्यात सोयाबीनची लागवड ही शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यातूनच करावी. फक्त त्या आधी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन हंगामात बियाणे व खतांची टंचाई भासू नये, तसेच त्याची उपलब्धता ही वेळेवर व किफायतशिर दरात व्हावी,याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष असावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

Tags: akola news
Previous Post

“या” कुटूंबांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार शिवाय २ हजाराचा किराणा माल मिळणार

Next Post

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आज 16 मृत्यू, 264 पॉझिटीव्ह.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आज 16 मृत्यू, 264 पॉझिटीव्ह.

Remdesivir

‘रेमडेसिविर’च्या बाटलीवर लिहा रुग्णाचे नाव व बिल क्रमांक; अन्न व औषधे प्रशासन विभागाचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.