• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, November 12, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

यंदा कोविडमुळे कोलमडलेले शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट

Media Desk by Media Desk
April 24, 2021
in शेती
Reading Time: 1 min read
81 0
0
शेतकऱ्याला
13
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

खरीप हंगाम अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत, बी-बियाणे याची खरेदी करण्यासाठीची सुरुवात केली आहे. मात्र शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहे.

कोविडमुळे लॉकडाऊन आणि खतांवरील वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस, शेती मालाचे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे  हाती आलेला शेती माल बेभाव विकावा लागल्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी. हीच परिस्थिती शेतकरी पुन्हा अनुभवत आहे. आताही कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे पुन्हा  लॉकडाऊन, पिकलेल्या शेतीमालाला बेभाव विकावे लागत आहेत. या नैराश्यग्रस्त परिस्थितीतून सावरत शेतकर्‍याने येणार्‍या खरीपाच्या पेरणीची पूर्वतयारी सुरू केली आहे.

हेही वाचा

फलोत्पादन विकास अभियानात आता औषधी व सुगंधी वनस्पतीचा समावेश

कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

खरीप हंगाम अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत, बी-बियाणे याची खरेदी करण्यासाठीची सुरुवात केली आहे.  मात्र शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहे. एकीकडे शेतकर्‍याने पिकवलेल्या शेतीमालाला मिळणारा भाव पाहता यावर्षी रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

सर्वसाधारणपणे खरिपाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील काड्या, फने, नांगरणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यात करण्यात येणारी कामे करायला सुरुवात केली आहे. पेरणीसाठी वेळेवर अडचण येऊ नये म्हणून शेतकरी मे महिन्यापासून बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे. शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात. यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही अशी चिंता शेतकरी  व्यक्त करत  आहे.

सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांशी बोलत असताना त्यांनी सांगितले की,  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी खतांच्या किंमतीत ३०० ते ५०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.   कोरोना लॉकडाऊनमुळे आधीच मोडकळीत निघालेली शेतकर्‍यांची  अर्थव्यवस्था खतांच्या दरवाढीमुळे पुरती कोलमडली आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे ७ एप्रिलपासून खतांच्या किमतीत प्रति बॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या अर्थचक्राला मोठा फटका बसणार आहे.  ही दरवाढ कशी हे जाणून घेत असतांना उदाहरण म्हणून इफ्को कंपनीने जाहीर केलेल्या किंमतीची पाहिल्या असता  डीएपी  खताच्या ५० किलो बॅगला आता १,९०० रुपये शेतकर्‍यांना द्यावे लागणार आहे. गेल्या वर्षी या बॅगची किंमत रुपये १३००/- इतकी होती. त्या आधी याच खताची किंमत १,१७५ रुपये होते.  १५:१५ या खताची किंमत पूर्वी १,००० रुपये होती आता याच खताची किंमत प्रति बॅग १,५०० रुपये इतकी झाली आहे.    १२:३२:१६ हे खत पूर्वी १,२५० रुपयांना मिळत होते आता त्यांची किंमत १,८०० रुपये इतकी आहे.  २०:२०:० हे खत ९५० रुपयाला होते आता १,३५० रुपयाला झाले आहे. १०:२६:२६ या खताची किंमत ५० किलो प्रति बॅग १०६५ होती आता १,४०० रुपये इतकी झाली आहे. १८:४६:०० या खताची  किंमत ५० किलो प्रति बॅग १,१०० रुपये इतकी होती आता १,७०० रुपये इतकी झाली आहे.  तसेच M.O.P. या खताची  किंमत ५० किलो प्रति बॅग ५७८ रुपये होती आता ही किंमत ८५० रुपये इतकी झाली. S.S.P या खताची किंमत ५० किलो प्रति बॅग ३१५ रुपये होती आता ही किंमत ३१५ रुपये इतकी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. वर्षभरात कपाशी पिकाला-तीन वेळा खत द्यावे लागते. सोयाबीन पिकाला एकरी एक बॅग खताची आवश्यकता असते. खताच्या किंमतीत सरासरी १५ ते १७ टक्के वाढ झालेली आहे. या भाववाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

शेती, शेतकरी आणि सद्य परिस्थिती याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील दिनेश सुपेकर या तरुण शेतकर्‍यांशी बोलतं असतांना त्यांनी सांगितले की, गेल्या १५-२०वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात खतांच्या किंमती कधीच वाढल्या नव्हत्या. जितक्या गेल्या पाच एक वर्षात वाढत आहे.  त्यामुळे खत खरेदी करण्यासाठी आम्हाला दहावेळा विचार करावा लागतो. रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली त्यामुळे रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किंमतीत प्रचंड दरवाढ केल्याचे म्हटले जात आहे.  या दरवाढीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

संकेत पाटील या तरुण शेतकर्‍याने याबद्दल मत मांडत असताना सांगितले की, कोरोनामुळे देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक अॅसिडच्या किंमती जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ही दरवाढ होत आहे. यासाठी केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदान जमा करावे म्हणजे शेतकर्‍याला थोडासा आर्थिक आधार मिळू शकेल असे मत व्यक्त केले.

खतांवरील दरवाढीच्या संदर्भात केंद्र सरकारने कोणतीही दरवाढ केलेली नाही ही भूमिका ९ एप्रिल रोजी केंद्र सरकारने  स्पष्ट केली असली तरी प्रत्यक्षात खतांच्या वाढलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत आहे.

देशातील  शेतकरी हा अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडला आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर २०२२ पर्यत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे म्हटले होते. सध्याच्या स्थितीत शेतीविषयक सरकारचे धोरण पाहता शेती आणि शेतकर्‍यांचे दुप्पट उत्पन्न हे शेतकर्‍यांसाठी दिवास्वप्न आहे. कोविडवर नियंत्रण मिळवले असे म्हणत असतांनाच फेब्रुवारी महिन्यापासून कोविड रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.  सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली हे वास्तव आहे.   या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणायची वेळ आली.

वीकएंड लॉकडाऊन, अंशत:  निर्बंध, रात्रीची संचारबंदी करत कडक लॉकडाऊनची वेळ आली. शेतीशीसंबंधित उत्पादनाची दुकाने सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरू असल्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतीची कामे कसे होतील असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. यासाठी शेतकऱ्यांचा समस्या लक्षात घेता राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहे. खते, बियाणे तसेच इतर अडचणी आल्यास राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट टोल फ्री नंबरवर कॉल करण्यास सांगितले आहे. त्यासाठी 8446117500 हा भ्रमणध्वनी क्रमांक असून 18002334000 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी नियंत्रण कक्षाशी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. हे क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहतील. सोबतच अडचण किंवा तक्रार असेल तर [email protected] यावर मेलवरसुद्धा ती नोंदवता येईल. अशी सूचना जारी केली आहे. पण खतांचे वाढते भाव, कर्जबाजारी शेतकरी, पर्यावरणीय बदल आणि लॉकडाऊनच्या चक्रात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी ही हेल्पलाइन किती उपयुक्त ठरेल हा खरा प्रश्न आहे.

Previous Post

अकोला: ऑक्सिजन खाटांसाठी रुग्ण दोन ते तीन तास वेटिंगवर!

Next Post

अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
Featured

फलोत्पादन विकास अभियानात आता औषधी व सुगंधी वनस्पतीचा समावेश

August 25, 2025
कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
Featured

कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

August 25, 2025
Featured

पारदर्शक, सुलभ व कागदपत्र विरहित पध्दतीने पीक कर्ज मंजुरी

August 19, 2025
kisan-credit-card
Featured

पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

August 19, 2025
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा
Featured

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

July 23, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
Next Post
dhananjay mundhe

अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती

अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.