• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर जनता भाजी बाजार येथे भाजी व फळ विक्री करण्‍यास पुर्णपणे बंदी

Team by Team
April 23, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
91 1
0
शेतकरी गट पोहोचविणार घरपोच भाजीपाला
21
SHARES
657
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :  महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांना सोईचे व्‍हावे याकरिता जनता बाजार येथील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची मनपा प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र मनपा आयुक्‍त यांच्‍या व्‍दारे जनता बाजाराची पाहणी केली असता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे तसेच सदर ठिकाणचे व्यवसायीक हे कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्‍याने आणि जनता बाजार येथुन कोरोना विषाणुचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्‍याने मनपा आयुक्‍त नीमा अरोरा यांनी अकोला शहरातील जनता भाजीबाजार संदर्भाने खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.

जनता भाजी बाजार येथील होलसेल व किरकोळ भाजीपाला व फळ विक्रीस दिनांक 23 एप्रिल ते 2 मे 2021 पर्यंत पुर्णत: बंदी राहील, जनता बाजार येथिल किराना व कृषीसेवा केंद्राची दुकाने ही सकाळी 7  ते 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. या व्यतीरीक्त कोणतीही दुकाने सुरु राहणार नाहीत, भाजीपाला व फळ हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार – वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार – लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील. महात्मा फुले भाजी बाजार – वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार – लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्याकरिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापूढे हर्रासी करीता वापर करता येणार नाही, जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायीक यांना भाटे क्लब प्रांगण येथेच व्यवसाय करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ फळ विक्री करणारे व्यवसायीक यांना मुंगीलाल बाजोरिया प्रांगण येथेच व्यवसाय करणे बंधनकारक राहील, किरकोळ भाजीपाला व फळ विक्री करीता व्यवसायीक यांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करावा. दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळुन आल्यास प्रशासनाकडुन व्यवसायीकांवर कोराना नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे गृहित धरुन कठोर कारवाई करण्यात येईल. व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.

वरील आदेश हे दि. 22 एप्रिलचे रात्री 8 वाजता पासून लागू होतील. तसेच आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या व्‍यावसायिकांविरुध्‍द महाराष्‍ट्र महानगरपालिका अधिनियम व साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 2005 अन्‍वये कारवाई करण्‍यात येईल. तरी व्‍यावसायिकांनी याची नोंद घेउन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.

Tags: akola newsVegeteble market in akolaजनता भाजी बाजार
Previous Post

माँ लटीयाल भवानी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव सपन्न

Next Post

Akola Corona News : 383 पॉझिटीव्ह, 304 डिस्चार्ज, आठ मृत्यू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Corona Cases

Akola Corona News : 383 पॉझिटीव्ह, 304 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Akola

Akola: हापूसचा दर कोरोना निर्बंधांनंतरही कायम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.