अकोट (शिवा मगर)-कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मा मुख्यमंत्री यांनी 20 एप्रिल रोजी ठराविक कालावधी सोडून संचार बंदीची घोषणा केलेली आहे तरी अकोट शहरा मधील काही लोक काम नसतानाही अकोट शहरामध्ये विनाकारण फिरत आहेत आजची परिस्थिती पाहता शहरांमधून तब्बल 84 रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळलेले आहेत अशा परिस्थितीत अकोट शहर चे ठाणेदार संतोष महल्ले यांनी कडक कारवाई करत काम नसता नाही बाहेर फिरणाऱ्या अकोट शहरा मध्ये तब्बल 70 वर वाहने जप्त करण्यात आले असून अनेकांवर गुन्हेही दाखल केले आहे.अकोट शहरातील पोलीस स्टेशन समोर व सोनू चौक शिवाजी चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली असून कोणतीही सुरक्षा न पाळता बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आता कड़क कारवाई केली जात आहे या नागरिकांविरुद्ध पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात येत आहे अनेक ठिकाणी थेट वाहनेच जप्त करण्यात आली आहेत. तर ही जप्त केलेली वाहने आता संचारबंदी संपुष्टात आल्यानंतरच संबंधितांना परत देण्यात येणार असण्याची माहिती मिळाली आहे
घरात रहा सुरक्षित रहा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या
हे पण वाचा : अकाेला महिला सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागतील नाला सफाईची कामे.