पातूर (सुनिल गाडगे) :- कुटुंबात अठरा विश्व दारिद्रय, अपंगत्व असलेल्या आईच्या उदरात जन्माला आला दोन्ही पायांनी अपंग गणेश नावाचा मुलगा आई वडीलांनी कुठलाही भेद भाव न करता आपल्या पोटच्या गोळ्याला योग्यप्रकारे लहानाचे मोठे करत आपल्या परिस्थिती नुसार चांगलं शिक्षण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
पातुरच्या तुळसाबाई कावल विद्यालयात त्याने शिक्षणाचे धडे घेऊन दहावी पर्यंतचे आपले शिक्षण अतिशय चांगल्याप्रकारे पुर्ण केले.शाळेत येण्या-जाण्या करीता त्याला शासनाच्या माध्यमातून तीन चाकी सायकल मिळाली होती. शाळेत त्याचे खुप चांगले मित्र होते त्याच्या प्रत्येक अडचणीत त्याला मदतीला धाऊन जात.अतिशय प्रामाणिक व सुस्वभावी असा त्याचा निर्मळ स्वभाव होता.आजच्या नवयुवकांनी त्याचा आदर्श घ्यावा असा मेहनत करून स्वाभिमानाने आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह चालवायचा त्याचे लग्न एका अपंगत्व असलेल्या संगिता नावाच्या मुलीशी झाला होता.त्यांच्या सुखी आयुष्यात एका गोंडस मुलाने जन्म घेतला त्यांचे आयुष्य एकदम आनंदीमय असे झाले होते गणेश एका टेलरच्या इथे कामाला जात होता काम करता करता त्याने आपल्या कौशल्याने टेलरींगचे ज्ञान अवगत केले होते.यावर कुणापुढे कशाचीही भिक न मागता त्याच्या संसाराचा गाडा चालत होता.भविष्याचा वेध घेत त्याने आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
जीवनात आपल्या अपंगत्वामुळे कधीही निराश न होता आहे त्या स्थितीत बिकट परिस्थितीशी सामना करत नेहमी यशस्वी होण्याचा त्याचा हा प्रवास सर्वांना आदर्शवादी आहे.मुंगी होऊन डोंगर खोदण्याचे त्याचे यशस्वी प्रयत्न काळाने त्याच्यावर झडप मारून मध्येच अपुर्ण राहिल्याने त्याच्या नातेवाईकांना, मित्रपरिवार व स्नेहीजनांना खुप मोठे दुःख देऊन गेले आहे. एक वर्षा आधीच त्याच्या वडिलांना देवाज्ञा झाली अशा अल्पशा आजाराने त्याचे चाळीसव्या वर्षी निधन झाल्यामुळे त्याच्या पश्चात त्याची अपंग आई,अपंग पत्नी व आठ वर्षाचा लहान मुलगा यांच्यावर खुप मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.आता गरज आहे त्याच्या परिवाराच्या पाठीवर मदत रूपी हाथ देण्याची म्हणून आज पातुर तालुका विकास मंचचे किरणकुमार निमकंडे यांच्या माध्यमातून पातुरचे तहसीलदार दिपक बाजड यांना त्यांच्या घरी आणून त्यांच्या दु:खात सामील करून शासनाच्या माध्यमातून काही तरी त्याच्या परिवाराला मदत मिळाली पाहिजे हा उद्देश होता.
तहसीलदार यांनीही तात्काळ आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे यावेळी पत्रकार प्रदीप काळपांडे, पत्रकार सुनील गाडगे , सामाजिक कार्यकर्ता सतीश इंगळे सचिन बारोकर गणेश इंगळे, अनिल गाडगे व इतर उपस्थित होते तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनाही त्यांच्या परिवाराला सामाजिक जाणीव ठेवून मदतीचे आवाहन केले आहे