अकोला – कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अकोला शहरातील जनता भाजीबाजार बंद करण्या संदर्भात १६ एप्रिल रोजी आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांसाेबत झालेल्या आढावा बैठकीत जनता भाजी बाजारात ठरवून दिलेल्या वेळेत विक्रीसाठी मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसाेबत झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त नीमा अरोरा यांनी बाजार संदभार्त आदेश दिले आहे.
जनता भाजी बाजार हा दिनांक 21 एप्रिल सकाळी 11 वाजता पासून पुढील आदेशापर्यंत ज्यांची जनता बाजार येथे किरकोळ भाजीपाला व फळ व्यवसायाची दुकाने आहेत त्यांनाच भाजीपाला व फळ विक्री करण्यास मुभा राहील. या व्यतिरिक्त ईतर कोणत्याही किरकोळ भाजीपाला व फळ विक्री करण्याऱ्याला या ठिकाणी व्यवसाय करता येणार नाही सदरची संपुर्ण बाजारपेठ हि सकाळी 7 ते सकाळी 11 वाजे पर्यंतच सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे
अशा आहेत सूचना
भाजीपाला व फळ हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार – वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार – लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील.
महात्मा फुले भाजी बाजार – वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार – लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्यारिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापुढे हर्रासीकरिता वापर करता येणार नाही.
जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेह अली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायीक यांची भाटे क्लब प्रांगण येथे व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
किरकोळ भाजीपाला / फळ विक्री करीता व्यवसायीक यांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करावा. दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून कोराना नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे गृहित धरुन कठोर कारवाई करण्यात येईल.
जनता भाजी बाजार येथे किराणा व जिवनावश्यक वस्तुंच्या विक्रींच्या व्यवसायास विहित कालावधी करिता व्यवसाय करण्याची मुभा राहील. 0 उपरोक्त व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन करणे तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.