तेल्हारा(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी असून अनेक ठिकाणी गोवंशाची खुलेआम पणे कत्तल होते आज सकाळी गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल होत असल्याची माहिती तेल्हारा पोलिसांना मिळाल्यावरून धाड टाकली असता आरोपींना गोवंशाची कत्तल करतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्राम खेलकृष्णाची(पंचगव्हान) येथे मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करण्यात येते हे या आधी अनेक कारवाया झाल्यावरून स्पस्ट होते आज सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदार नितीन देशमुख यांनी आपल्या ताफ्यासह खेळकृष्णाजी येथे एका घरावर पंचासमक्ष धाड टाकली असता गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे निर्दशनास आले यावेळी घटनास्थळी गोवंशाचे अवयव तसेच ६० किलो गोवंशासह अंदाजे १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी जब्बार कुरेशी नासिर कुरेशी वय ३१ वर्ष ,शेख इमरान शेख उस्मान वय २५ वर्ष दोन्ही रा खेलकृष्णाजी(पंचगव्हान) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.आरोपीविरुद्ध कलम ५ ,५ (क),९,९(अ)महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम ,भांदवी ४२९ नुसार कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ठाणेदार नितीन देशमुख,पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे,पो हे कॉ राजू इंगळे, पो कॉ अमोल नंदाने, सागर मोरे यांनी केली.