• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला : कोविड उपचार पद्धतीच्या सुधारीत निर्देशांबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण

Team by Team
April 17, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, आरोग्य
Reading Time: 1 min read
78 0
0
अकोला : कोविड उपचार पद्धतीच्या सुधारीत निर्देशांबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण
14
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. १६- राज्य  टास्क फोर्स कडून प्राप्त कोविड १९ च्या रुग्णांवर करावयाच्या उपचार पद्धतींबाबत सुधारित निर्देशांबाबत काल दि. १६ जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टर्सना अद्यावत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील कोविड रुग्णांना वाजवी दरात व कुठलाही त्रास न होता उपचार सेवा व सुविधा उपलब्ध करुन द्यावी,असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित डॉक्टर्सना केले.

येथील नियोजन भवनात आयोजित या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.  आरती कुलवाल,  डॉ. घोरपडे, डॉ. श्याम शिरसाम, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व तज्ज्ञ साधन व्यक्ती डॉ. मुकुंद अष्टपुत्रे हे उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या प्रशिक्षणात डॉ. अष्टपुत्रे यांनी उपस्थितांना  कोविड १९ च्या उपचार पद्धतीच्या नियमावलीत नव्याने झालेल्या सुधारणांबाबत माहिती दिली. त्यात रुग्णांचे संसर्गाच्या पातळीनुसार वर्गिकरण करणे, त्यानंतर वेगवेगळ्या वर्गिकरणानुसार उपचार पद्धतीचा अवलंब करणे, यावेळी त्यांनी सांगितले की, रॅपिड वा आरटीपीसीआर या चाचण्यांमधून रुग्णाला कोविड संसर्ग झाल्याचे निश्चित झाल्याशिवाय  उपचार सुरु करु नयेत. काही लोक केवळ सिटीस्कॅन करुन एचआरसीटी अहवालानुसार थेट कोविडचे उपचार सुरु करतात, असे करु नये. निदानानंतरचे दहा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच कालावधीत उपचारांची दिशा पहिल्या तीन दिवसात निश्चित करणे  आवश्यक आहे. यावेळी त्यांनी योग्य पद्धतीने रेमडेसिविर चा वापर,  आवश्यकतेनुसार स्टेरॉईडस्चा वापर  तसेच अधिक जटील अवस्थेत ऑक्सिजनचा वापर याबाबत माहिती दिली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारांबाबतची निरीक्षणेही नोंदविली.

आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी पापळकर यांनी सर्व रुग्णालय संचालकांना आवाहन केले की, सर्व रुग्णालयांनी आपले ऑक्सिजन वापराचे ऑडीट करुन घ्यावे. तसेच फायर ऑडीट व  फायर सेफ्टीचे सर्व निकष तातडीने पूर्ण करावे. हॉस्पिटलची  विद्युत यंत्रणा सदोष नसल्याची खातरजमा करावी. थेट एचआरसीटी करुन रुग्णांवर कोविड उपचार सुरु करणे चुकीचे असून याबाबत रेडीऑलॉजिस्टने  त्यांच्याकडे केलेल्या एचआरसीटी चाचण्यांबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी व पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाने आपल्याकडील ऑक्सिजनची मागणी  दररोज नोंदवावी. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Tags: akola newsAkola news in Marathidoctors trainiing for covidराज्य टास्क फोर्स
Previous Post

अमरावती: स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी

Next Post

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Scholarship

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

acb

एसीबीच्या जाळ्यात सापडले अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.