• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे- बच्चू कडू

Team by Team
April 15, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे- बच्चू कडू
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून पंधरा दिवस राज्यात संचारबंदी घोषित केली आहे. या संचार बंदी च्या काळात नागरिकांनी घरातच राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केले.

जिल्हाधिकारी दालनात कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा :अकोला जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू, ३६६ नव्याने पॉझिटिव्ह

कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही,याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे निर्देश कडू यांनी दिले. ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी हवेतून ऑक्सीजन घेण्याबाबतचा प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, रेडमीसिविर इंजेक्शन तसेच बेड ची कमतरता पडणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ५० खाटांचे आयसीयु युनिट तयार करण्याबाबत सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.

शिवभोजन व मोफत अन्नधान्याबाबत नियोजन करा

जिल्ह्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. अत्यंत गरीब व ज्यांना जेवणाची व्यवस्था नाही अशा गरजूंसाठी शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. यासाठी गरजुंची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवभोजन थाली व प्राधान्य गटांना देण्यात येणारे मोफत अन्नधान्य याबाबत नियोजन करावे व याचा गैरवापर होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना बच्चू कडू यांनी दिल्या.

अधिक वाचा : राज्यासह अकोला जिल्ह्यात ३० एप्रिल पर्यंतचे संचारबंदी आदेश जारी, वाचा काय सुरु; काय बंद

Tags: akola newscorona curfuewcurfew in akolaसंचार बंदी
Previous Post

सावध राहा, काळजी घ्या! चिमुरड्यांसाठी कोरोना बनलाय राक्षस; १४ दिवसाच्या मुलाचा घेतला जीव

Next Post

खुशखबर! घरोघरी जाऊन लस देण्याबाबत लवकरच होणार निर्णय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
vaccination

खुशखबर! घरोघरी जाऊन लस देण्याबाबत लवकरच होणार निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.