कोरोनाची लाट थोपवण्यासाठी लसीकरण वाढवावे लागेल. कोरोनाची ही लाट भयानक आहे. लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत आहे हे जगभरातील अनुभवानंतर लक्षात आले. ब्रिटनमध्ये साडेतीन महिने कडक लॉकडाऊन केले. पहिला डोस झाल्यानंतर तेथे वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी झाला. आपल्यालाही त्या वाटेवरून जावे लागेल, यासाठी उद्या रात्री आठ वाजल्यापासून पुढील १५ दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन अटळ आहे.
ते म्हणाले, राज्यात ऑक्सिजन, बेड आणि रेमडेसिवीरची कमतरता आहे. वाढत्या प्रादूर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण. औषधे कमी पडणार नाही याची व्यवस्था केली आहे. राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून दिवसभरात ६० हजार, २१२ नवीन रुग्ण सापडले आहेत.
आपण कोणतीही गोष्ट लपवत नाही. आम्ही धाडसाने तोंड देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की, केंद्र सरकारने मदत करावी. ही मदत ऑक्सिजनरुपी मदत करावी अशी सांगितली आहे. ईशान्येकडील राज्यातून जर ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे. रस्ते वाहतुकीने ऑक्सिजन आणणे हे व्यवहारी नाही. तो हवाई वाहतुकीने आणणे शक्य असल्यास तसे एअरफोर्सला विनंती करून तशी उपलब्धता करून द्यावी, अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे. सध्या उद्योग संकटात असल्याने जीएसटी परतावा देण्यासाठी किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी.
उद्या रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध
काय असतील निर्बंध
-उद्या संध्याकाळपासून कलम 144 लागू (संचारबंदी)
-आवश्यक काम, अत्यावश्यक नसल्यास घराच्या बाहेर पडता येणार नाही
-सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
-जनावरांशी संबंधित, पाळी प्राण्यांसाठीचे दवाखाने उघडे राहतील
-लोकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होणार
-पावसाळ्यातील कामे आधीच करणं गरजेचं आहे. ती कामं सुरु राहतील
– अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्व आस्थापना बंद
– हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार
– पुढेचा १ महिना शिवभोजन मोफत
– ७ कोटी लोकांना तीन किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत
हे राहणार सुरु
– पेट्रोल पंप कार्गो सेवा सुरु
– सकाळी ७ ते रात्री आठ जीवनावश्यक सेवा सुरु राहणार
– पार्सल सेवा सुरु राहणार