चोहट्टा बा(पूर्णाजी खोडके)- अकोट तालुक्यातील टाकळी बु परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे परिसरातील टाकळी बु गावामध्ये व परिसरात देशी दारूची खुलेआम विक्री होत आहे याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे टाकळी बु परिसरातील गावांमध्ये दारू विकणारा पर्यंत दारूचे बॉक्स पोहोचवल्या जातात परंतु पोलीस विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे गावातील तरुण दारूच्या आहारी जात आहेत गावागावात दारुमुळे अनेक घरे उदध्वस्त होत आहेत त्यामुळे भांडणाचे प्रमाण वाढले आहे रस्त्याने जात येत असलेल्या महिलांना सुद्धा याचा त्रास होत आहे दहीहंडा ठाणेदार यांनी अवैध दारू विकणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी टाकळी बु व परिसरातील नागरिकांकडून होत आहे याकडे पोलिसांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे….