• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन

Team by Team
April 5, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील पत्रकारांना उत्तराखंडच्या धर्तीवर कोविड-19 ची लस देणे तसेच कोरोनाने बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद्राच्या धर्तीवर पाच लाख रूपयांची आर्थिक मदत देणेबाबत मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या आवाहनानुसार तेल्हारा तालुका पत्रकार संघाने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले व त्याच बरोबर ई-मेल वरून संदेश पाठविले गेले.

कोरोना काळात राज्यातील पत्रकारांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहे.लोकांना जागरूक करण्याचेच काम पत्रकारांनी केले असे नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेला आणि कोरोना बाधितांना मदत करण्याचे काम करत अनेक पत्रकारांनी “फ्रंन्टलाईन वर्कर”ची भूमिका पार पाडली आहे.पत्रकारांच्या या भूमिकेचा पंतप्रधानांनी ‘कोरोना योध्दे’ अशा शब्दात गौरव केलेला आहे.आपली सामाजिक जबाबदारी पार पाडताना राज्यातील जवळपास 800 पत्रकार कोरोना बाधित झाले.त्यातील 78 पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतले आहेत.ज्यांचे बळी गेले अशा पत्रकारांचे कुटुंबं आज रस्त्यावर आली आहेत.अनेकांना कोणताच आधार उरलेला नाही.अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या पत्रकारांच्या कुटुबाला आर्थिक मदत करणे हे सरकारचं कर्तव्य आहे.आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे यानी खामगाव येथील एका कार्यक्रमात कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपये देण्याची घोषणा केली होती.ती घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही.आमची आपणास विनंती आहे की,पन्नास लाख नाही तर किमान पाच लाख रूपयांची मदत तरी दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना झाली पाहिजे.केंद्र सरकारने दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे.त्याच धर्थीवर महाराष्ट्रात देखील सरकारने आर्थिक मदत करावी अशी आमची विनंती आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 40 ते 50 या वयोगटातील पत्रकार जास्त बाधित झाल्याचे आणि त्यातील काहींचे मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे.हे लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही गेली महिनाभर सरकारकडे यासाठी पाठपुरावा करतो आहोत की,सर्व वयोगटातील पत्रकारांना ही लस दिली जावी मात्र सरकार त्याबाबत काही निर्णय घेताना दिसत नाही.त्यामुळे तरूण पत्रकारांचे बळी जात आहेत.आमच्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार राज्यातील 78 पत्रकारांचे कोरोनाने बळी घेतले आहेत…800पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले आहेत.प्रत्यक्षात ही आकडेवारी यापेक्षा मोठी असू शकते..कारण अनेक घटना समोर आलेल्याही नाहीत..देशात सध्या 45 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचे लशीकरण सुरू आहे.पत्रकार हे फ्रन्टलाईन वर्कर आहेत हे लक्षात घेऊन सर्व वयोगटातील पत्रकारांसाठी तातडीने लस उपलब्ध करून द्यावी आणि पत्रकारांचे प्राण वाचवावेत.यासाठी सरकारला फार वेगळे काही करावे लागणार नाही.तेव्हा हा निर्णय तातडीने घ्यावा अशा आशयाचे निवेदन मराठी पत्रकार परिषद चे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,किरण नाईक, गजानन नाईक , अध्यक्ष शरद पाबळे, माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, अकोला जिल्हा अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे सत्यशील सावरकर,प्रल्हादराव ठोकणे, सुरेश शिंगणारे,अनंत अहेरकर,कृष्णा फंदाट, रामभाऊ फाटकर,सदानंद खारोडे,धर्मेश चौधरी, प्रशांत विखे,अनिल जोशी, निलेश जवकार ( जिल्हा समन्वयक मिडीया सेल)अनिल अवताडे, राहूल मिटकरी, विद्याधर खुमकर,शुभम सोनटक्के, रवि शर्मा,दत्तात्रय बिहाडे,बसवेश्वर मिटकरी, अमित काकड, सुरेश सिसोदिया,विशाल नांदोकार, विलास बेलाडकर ,पंकज भारसाकले, आनंद बोदडे इत्यादी पत्रकार बांधवांनी निवेदन व ई-मेल पाठवून सहभाग नोंदविला.

Tags: Telhara Taluka Press Associationतेल्हारा तालुका पत्रकार संघ
Previous Post

अनिल देशमुखांच्या विरोधात रिट याचिका दाखल करणा-या ॲड. जयश्री पाटील आहेत तरी कोण?

Next Post

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री?; पवारांचे स्वीय सहाय्यक ते…

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री?; पवारांचे स्वीय सहाय्यक ते...

corona

अकोला जिल्ह्यात २०३ पॉझिटीव्ह, ५७८ डिस्चार्ज, चौघांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.