अकोट(सारंग कराळे)– संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टीक कॅरीबॅगवर बंदी असतांना अकोट शहरात प्लॅस्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून या पासून पर्यावरणाला धोका तर होत आहे तसेच अकोट शहरामध्ये मुक्या जनावरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
अकोट शहरातील फेरीवाले भाजीवाले सह सर्वच ठिकाणी प्लॅस्टीक कॅरीबॅग चा वापर अकोट शहरात खुलेआम पणे दिसून येत आहे यावर अकोट नगर परिषदेचा आरोग्य विभाग जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहेत तरी अकोट शहरातील कॅरीबॅगवर वापरणारावर कठोर कारवाई करण्याकरीता अकोट बजरंग दलाकडून अकोट नगर परिषदेचे मुख्यधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देवून मागणी करण्यात आले असून या निवेदनावर गजानन माकोडे गोपाल कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा टेमझरे, मनोज साखरे,शुभम सोनोने, शुभम चंदन,निलेश तिवारी,प्रवीण जीवराजणी,मनीष बुंदले,महादेव भावे,धीरज देठे,आशीर्वाद शेगोकार,शुभम गणगने, श्रावण चांडक,गणेश पुंडकर, प्रणव पाटील, अंकुश काटे,विशाल गासे व असंख्य बजरंग दल चे कार्यकर्ते उपस्थित होते.