अकोला : रोजंदारी मजूर, बँड पथक, शेतकरी-शेतमजूर, छोटे दुकानदारांना गतवेळच्या लॉकडाउनमध्ये हाल सहन करावे लागले. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन लागू केला तर मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन लावण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय हा काही कोरोना संसर्ग नियंत्रणाचा उपाय नाही. गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकार कोविडची हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात अपयशी ठरलं आहे. याचा परिणाम असा झाला की, जेव्हा महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला बेड व व्हेंटिलेटरची कमतरता भासू लागली आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. आपण एक नारा दिला होतात, माझं कुटुंब माझी जबाबदारी… मी जबाबदार.. होय उद्धवजी महाराष्ट्राच्या जनतेला बेड्सची कमतरता दिसून येतेय, तर त्याची जबाबदारी व महाविकास आघाडीची आहे.
तरीही आपल्याला जर लॉकडाउन लावायचे असेल तर रोजंदारी मजूर, मिडल क्लास फॅमिली तसेच अठरा पगड जाती बारा बलुतेदार शेतकरी, शेत्मजुर तसेच छोट्या दुकानांमध्ये काम करणारे कामगार यांची खाण्यापिण्याची, औषधांची व्यवस्था करून, त्यांना एक पॅकेज देऊन मगच हा लॉकडाउन लावा. नाहीतर महाराष्ट्राला एका मोठ्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी असेल, असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी इशारा दिला.